विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
गोंडवाना विद्यापीठातील विविध प्राधिकरण निवडणूक 2022 करिता अधिसभा, विद्या परिषद,अभ्यास मंडळाच्या निवडणुकां करिता मतदार म्हणून नाव नोंदणी बाबत विद्यापीठाने 12 एप्रिल पर्यंत मुदत दिलेली होती. ही मुदत वाढविण्याच्या संदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने कुलसचिव व निवडणूक अधिकारी डॉ.अनिल चिताडे याना निवेदन दिले होते.
दरम्यान संघटनेची मागणी लक्षात घेऊन विद्यापीठाने तात्काळ अवघ्या 2 तासात 26 एप्रिल 2022 पर्यंत नाव नोंदणी करीत मुदतवाढ देण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे यामुळे प्राध्यापक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या आधी विद्यापीठाने आपल्या पूर्वीच्या निर्गमित परिपत्रकामध्ये नाव नोंदणीची मुदत 12 एप्रिल 2022 एवढी ठेवली होती. मात्र उष्ण तापमान व दळणवळण साधनांचा प्रश्न लक्षात घेता व इतर कारणांमुळे प्राधिकरणाच्या निवडणुकीकरिता ची नाव नोंदणीची प्रक्रिया अनेक महाविद्यालयाने पूर्ण केलेली नव्हती.
या पार्श्वभूमीवर संघटनेने नाव नोंदणी करता मुदतवाढीची मागणी केली होती यासंदर्भात कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांना गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ.विवेक गोरलावार,डॉ. राजेंद्र गोरे डॉ. राजू किरमिरे,डॉ. अभय लाकडे,डॉ.प्रमोद बोधाने,प्रा.संजय राऊत, सिनेट सदस्य डॉ. प्रगती नरखेडकर डॉ. कैलास भांडारकर इत्यादी संघटनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठात भेट घेऊन निवेदन दिले होते. विद्यापीठाने तात्काळ संघटनेच्या मागणीची दखल घेऊन मुदतवाढ दिली त्याबद्दल संघटनेच्या वतीने माननीय कुलगुरू, कुलसचिव व प्र कुलगुरू यांचे आभार मानण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.