Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माता महाकाली यात्रेसाठी चंद्रपूरात दाखल होत असलेल्या भाविकांच्या सोयी सुविधेत वाढ करा - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माता महाकाली यात्रेसाठी चंद्रपूरात दाखल होत असलेल्या भाविकांच्या सोयी सुविधेत वाढ करा  - आ. किशोर जोरगेवार यात्रेतील सोयी सुविधांची केली पाह...

  • माता महाकाली यात्रेसाठी चंद्रपूरात दाखल होत असलेल्या भाविकांच्या सोयी सुविधेत वाढ करा  - आ. किशोर जोरगेवार
  • यात्रेतील सोयी सुविधांची केली पाहणी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेसाठी चंद्रपूरात दाखल होत असलेल्या भाविकांची उत्तम व्यवस्था करणे आपली जबाबदारी आहे. त्यामूळे भाविकांची गैरसोय होणार नाही या दिशेने उपाययोजना करत त्यांच्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सोयी सुविधेत वाढ करण्याची गरज आहे. येत्या एक दोन दिवसात भाविकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुर्व तयारी करत येथील सोयी सुविधेत वाढ करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहीते यांना केल्या आहे. 
आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसराची पाहणी करत येथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, सफाई विभागाचे संतोष गर्गेलवार, यंग चांदा ब्रिगेडचे राशेद हुसेन, विश्वजित शाहा, यांच्यासह मनपा अधिका-र्यांची उपस्थिती होती.
चैत्र महिन्यात भरणा-या महाकाली यात्रेला राम नवमी पासुन सुरवात झाली आहे. या यात्रेसाठी राज्यासह राज्याबाहेरील भक्त मोठ्या संख्येने चंद्रपूरात दाखल होत आहे. या भक्तांसाठी महानगर पालिकेच्या वतीने सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी यात्रेतील सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी यात्रेकरुंसाठी महानगर पालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रालाचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. येथे बेडची व्यवस्था नसल्याने उष्मघाताच्या रुग्णांसाठी तात्काळ दोन बेड उपलब्ध करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्या. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top