धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मेडिकल असोसिएशन गडचांदूर व स्क्वाबे कंपनीच्या वतीने होमिओपॅथी चे जनक डॉ. हॅनिमन यांची जयंती स्थानिक शरदराव पवार महाविद्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आले ल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. रुपेश सोडवले होते, प्रमुख अतिथी म्हणून मेडिकल असोसिएशन चे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप खेकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, होमिओपॅथी डॉ. के.आर. भोयर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मधुकरराव चापले, प्रा. अशोक डोईफोडे, प्रा. विजय आकनूरवार होते.
सर्वप्रथम होमिओपॅथी चे जनक डॉ. हॅनिमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून द्वीपप्रज्वलन करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी उपस्थित अतिथीनी होमिओपॅथी द्वारे रोग कायम स्वरूपात बरा होतो, तसेच स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असल्याचे सांगितले, डॉ. हॅनिमन यांच्या जीवनकार्य वर प्रकाश टाकला,
स्क्वाबे च्या वतीने सर्व उपस्थित अतिथीना डॉ. हॅनिमन यांच्या प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. के. आर. भोयर यांनी केले, संचालन डॉ. निलेश किंगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. स्वपनेश चांदेकर यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. हर्षानंद हिरादेवे, डॉ माधवराव केंद्रे, डॉ प्रवीण लोनगाडगे, डॉ. अरुण ठाकरे, डॉ. देवराव ठावरी, डॉ. दीपक मेश्राम, डॉ. प्रवीण पेटकर, डॉ. निखिल डाखरे, डॉ. श्रीनिवास सोनटक्के, डॉ, सविता काटकर, डॉ. विशाल धोटे, डॉ. पंकज देरकर, डॉ. आरती पानघाटे, डॉ. मंदाकिनी देरकर, डॉ, जयदीप चटप, डॉ. रोहित गोवारदीपे, डॉ, विपुल गिरटकर,शैलेश विरुटकर,नितीन निवलकर, संजय ठाणेकर उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.