Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महामानवास अभिवादन करताना आमदार सुभाष धोटे व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी डॉ. बाबासाहेब आंबेडक...
महामानवास अभिवादन करताना आमदार सुभाष धोटे व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान करत वाहिली आदरांजली
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संविधान चौकात बाबासाहेबांच्या हजारों अनुयायांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील असंख्य अनुयानी, संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी आदरांजली वाहिली. संस्था-संघटनांद्वारे जयंतीनिमित्त येणाऱ्या अनुयायांकरिता ताक, लस्सी, शरबत, बुंदी, मसाला भात चे वाटप करण्यात आले होते याचा शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला. 
रक्तदान करत वाहिली आदरांजली
वंचित बहुजन आघाडी तालुका राजुरा शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुपर मार्केट येथे झालेल्या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवांना आदरांजली वाहिली. रक्तदान शिबिराला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक जाधव, डॉ. बांबोळे, धनंजय वाघ, डॉ. गावित, जय पचारे, विजय निवलकर यांनी सहकार्य केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा सचिव रमेश लिंगंमपल्लीवार, जिल्हा सदस्य भगीरथ वाकडे, तालुका अध्यक्ष सुशील मडावी, उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, महासचिव रविकिरण बावणे, महासचिव सदानंद मडावी, प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, सुरेंद्र फुसाटे, राहुल अंबादे, रवी झाडे, धनराज उमरे, उत्कर्ष गायकवाड, आकाश नळे, सुभाष हजारे, जमाते इस्लामी हिंद राजुरा आणि हजरत टिपू सुलतान फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top