Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: निराधार निराश्रित गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप करून महामानवांची जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
निराधार निराश्रित गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप करून महामानवांची जयंती साजरी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स अकोला - अकोट तालुक्य...
  • निराधार निराश्रित गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप करून महामानवांची जयंती साजरी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
अकोला -
अकोट तालुक्यातील एदलापुर या छोट्या गावचे हस्ताक्षर कलावंत तथा समाजसेवक विनायक काशीराम धांडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून 131 अनाथ निराधार निराश्रित आणि रस्त्यावरील गरजू मुलांना सन्मानाने व वात्सल्यातुन कपडे व शैक्षणिक साहित्याचे आश्रय ध्यान फाउंडेशन च्या वतीने वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विनायक धांडे यांनी कपडे व शैक्षणिक साहित्य स्वीकारल्या बाबत बालकांचे व गरजूंचे आभार मानले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top