Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोठ्याला लागली आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोठ्याला लागली आग स्पिन्कलर पाईप व शिवार जळून खाक , एक लाखाचे नुकसान धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - जिल्ह्याच्या तापमानात...

  • गोठ्याला लागली आग
  • स्पिन्कलर पाईप व शिवार जळून खाक , एक लाखाचे नुकसान
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. या तापमानाच्या तडाक्यात कोरपना तालुक्यातील खिर्डी गावातील शेतकरी राजेंद्र मालेकर यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने शेतात असलेल्या स्पिनकलर पाईप, शेतीसाहित्यासह शिवार जळून खाक झाला आहे. 
सदर घटना दुपारच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्याचे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सदर घटनेची माहिती तलाठी अन्सारी यांना देण्यात आली असून आगीचा पंचनामा करण्यात येणार आहे. आग लागण्याचे कारण अजून नसून अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्यांला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top