Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पेसा क्षेत्रातील आदिवासी युवक-युवतींना संधी द्या - आबिद अली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पेसा क्षेत्रातील आदिवासी युवक-युवतींना संधी द्या - आबिद अली राज्यमंत्री तनपुरे यांना निवेदन सादर धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी को...
  • पेसा क्षेत्रातील आदिवासी युवक-युवतींना संधी द्या - आबिद अली
  • राज्यमंत्री तनपुरे यांना निवेदन सादर
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
जिल्ह्यातील कोरपना, जिवती, राजुरा या भागातील स्थानिक आदिवासी कोलाम समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून ग्रामीण व्यवस्थेला चालना देण्यासाठी 12वी किंवा पदवीधर युवक, युवतींना ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य सेवक, सेविका, वनरक्षक या पदावर निवड करुण पुढील 5 वर्षात आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त करण्याची संधी द्यावी व पेसा कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आबिद अली यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवतीतील शेकडो गावे पेसा कायद्यांतर्गत निश्चित केले आहे. या भागातील 90 पेक्षा अधिक ग्रामपंचायती पेसांतर्गत जिप, शाळा, वनरक्षक, तलाठी, आरोग्य सेविका, ग्रामसेवक ही पदे गावाच्या जनतेशी नाळ जोडणारी आहे. पेसा अंतर्गत शासन गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देत असला तरी सामाजिक व आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागात स्थानिक अनु.जमाती वर्गातील गोंड, कोलाम, परधान समुहात बेरोजगार युवकाची संख्या अधिक आहे. या तालुक्यात सिमेंट, कोळसा उघोग असला तरी स्थानिक कामगार ऐवजी परप्रांतीय कामगाराना संधी दिल्या जाते. आदिवासी युवकाना काम देण्यासाठी कंपनी पाठ फिरविते असे चित्र आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रातील गावात तुतीयश्रेणी कर्मचारी आदिवासी युवकांना नोकरी आधी संधी द्यावी, स्थानिक आदिवासी कोलाम समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून ग्रामीण व्यवस्थेला चालना देण्यासाठी 12 वी किंवा पदवीधर युवक, युवतींना या पदावर निवड करून आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त करण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top