Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जन्मोत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जन्मोत्सव साजरा श्याम-शुभम यांनी दिली भजनाची सुंदर प्रस्तुती भाविकांनी मनमुराद लुटला भजनाचा आनंद  आमचा विदर्भ - ...

  • भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जन्मोत्सव साजरा
  • श्याम-शुभम यांनी दिली भजनाची सुंदर प्रस्तुती
  • भाविकांनी मनमुराद लुटला भजनाचा आनंद 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्याने दोन वर्षानंतर शहरासोबतच ग्रामीण भागात हनुमान जन्मोत्सव आज मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरात व ग्रामीण भागांमध्ये मोठ्या संख्येने हनुमानांचे मंदिरे आहेत.
दरवर्षी सर्व मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव निमित्त पहाटे पासूनच भाविकांची लगबग सुरू असते. प्रभू श्रीराम नवमी उत्साहात साजरी झाल्यानंतर आज रामभक्त हनुमानाचाही जन्मोत्सव पहाटे शहरात मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आज सूर्योदयापासूनच सर्व हनुमान मंदिरात भाविकांची रेलचेल होती. शहरातील मेन रोड वरील श्री हनुमान देवस्थान, एसटी आगारा जवळील वन उद्यान येथील हनुमान मंदिर, जवाहर नगर, सोमनाथपूर, देशपांडे वाडी, डोहे वाडी, रामपूर, सास्ती आणि तालुक्यातील शेकडो हनुमान मंदिरात आयोजित महाप्रसादाचा हजारों भाविकांनी लाभ घेतला.  
भाविकांचे अपार श्रद्धास्थान हनुमान सरोवराच्या तीरावर असलेल्या श्री संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील प्रसिद्ध भजन गायक श्याम-शुभम यांनी भजनाची सुंदर प्रस्तुती दिली. उपस्थित भाविकांनी भजनाचा मनमुराद आनंद लुटला शेवटी रात्री हनुमान चालीसा चे सामूहिक पठण करण्यात आले. आज सकाळी श्री संकटमोचन हनुमान मंदिरात महाभिषेक, हनुमान चालीसा पाठ, रामनामाचा जप व आरती करून विधिवत पुजा करण्यात आली. बरोबर सूर्योदयाच्या वेळी उपस्थित शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करून संकटमोचन हनुमान की जय, जय श्रीराम... जय श्रीराम... च्या जयघोषात हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला. सकाळी ९ वाजता पासून महाप्रसादाला सुरुवात झाली. हजारों भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top