Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मिलिंद गंपावार यांची आर्ट ऑफ लिविंग डिस्ट्रिक्ट टीचर्स कोऑर्डिनेटर पदी नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मिलिंद गंपावार यांची आर्ट ऑफ लिविंग डिस्ट्रिक्ट टीचर्स कोऑर्डिनेटर पदी नियुक्ती शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - आर्ट ऑफ लिविंग ...

  • मिलिंद गंपावार यांची आर्ट ऑफ लिविंग डिस्ट्रिक्ट टीचर्स कोऑर्डिनेटर पदी नियुक्ती
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्य संघटनेचे नागपूर-विदर्भ झोन संघटन सचिव मिलिंद गंपावार यांची आर्ट ऑफ लिविंग चंद्रपूर डिस्ट्रिक्ट टीचर्स कोऑर्डिनेटर (DTC) या पदावर नियुक्ती करण्यात आली. याबाबतची घोषणा हॉटेल विजयालक्ष्मी रेसिडेन्सी मध्ये दि. 14 एप्रिलला झालेल्या प्रशिक्षक सभेत आर्ट ऑफ लिविंगचे स्टेट कोऑर्डिनेटर राजेश शेट्टी यांनी केली.
यावेळी राज्यसंघटनेच्या श्रीमती नंदादीदी सुगंध, सौ प्रतिभा शेट्टी, सीए विश्वम्भर कुमार तसेच स्थानिक प्रशिक्षक, साधक उपस्थित होते. मनमिळाऊ व सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे मिलिंद गंपावार यांची आर्ट ऑफ लिविंग डिस्ट्रिक्ट टीचर्स कोऑर्डिनेटर पदी नियुक्ती झाल्यामुळे AOL परिवारात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आता पर्यंत ही जवाबदारी डॉ. राधा हस्तक यांनी सार्थ केली. या दोघांनाही पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top