Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिप प्राथमिक शाळा बैलमपूर येथे राबविण्यात आला कॅच द रेन उपक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिप प्राथमिक शाळा बैलमपूर येथे राबविण्यात आला कॅच द रेन उपक्रम  पाण्याचे महत्त्व पटवून देत पाण्याचा सदुपयोग कसा करावा याबाबत दिली माहिती गाव...
  • जिप प्राथमिक शाळा बैलमपूर येथे राबविण्यात आला कॅच द रेन उपक्रम 
  • पाण्याचे महत्त्व पटवून देत पाण्याचा सदुपयोग कसा करावा याबाबत दिली माहिती
  • गावातील भिंतीवर लावण्यात आले जनजागृती करणारे भित्तीपत्रक
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
जिल्हा परिषद उच्च  प्राथमिक शाळा, बैलमपूर येथे नेहरू युवा केंद्र च्या वतीने कॅच द रेन हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक खामानकर, पवार, चव्हाण, शिंदे मॅडम, जिभकाटे मॅडम, नेहरू युवा केंद्रच्या प्रतिनिधी शुभांगी रत्नपारखी प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले व पाण्याचा सदुपयोग  कसा करावा याबाबत माहिती दिली. तसेच गावात जनजागृती करणारे भित्तीपत्रके भिंतीवर लावण्यात आली.
कॅच द रेन या विषयावर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा सिडाम, द्वितीय क्रमांक संवेदना शंभरकर, तर तृतीय क्रमांक रजनी तेलतुंबडे यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके व प्रमाणपत्र शुभांगी रत्नपारखी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी, गावकरी सहभागी झाले होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top