Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संपाच्या दुसऱ्या दिवशी उत्पादन व डीस्पॅच ठप्प
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संपाच्या दुसऱ्या दिवशी उत्पादन व डीस्पॅच ठप्प कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाला कामगारांचा जोरदार पाठिंबा आमचा विदर्भ - ब्युरो ...
  • संपाच्या दुसऱ्या दिवशी उत्पादन व डीस्पॅच ठप्प
  • कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाला कामगारांचा जोरदार पाठिंबा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाच्या पहिल्या दिवशी कामगारांचा जोरदार पाठिंबा मिळाला. बल्लारपूर क्षेत्रातील वेकोलिच्या सर्व आठ कोळसा खाणीत आजही भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्याशिवाय कुणीही कामावर गेले नाहीत. यामुळे वेकोलिला कोट्यावधींचा फटका बसला असून कोळशाचे उत्पादन व डीस्पॅच पूर्णपणे ठप्प होते. आज संपात बल्लारपूर क्षेत्रातील सुमारे साडेतीन हजार वेकोलि कामगार सहभागी झाले होते. आजही काही कामगारांना व्यवस्थापनाने फोन करून बोलविण्याचा प्रयत्न केला, मात्र, कामगारांनी त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. ठेकेदारी कामगार कामावर न आल्याने कुठलेही काम आजही खाण क्षेत्रात झाले नाही. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, गोवरी, पोवनी, धोपटाला, साखरी, गोवरी डीप या ओपनकास्ट आणि बल्लारपूर भूमिगत कोळसा खाणीत अंशी टक्के कामगार संपात उतरल्याने आणि प्रत्यक्ष उत्पादनात कार्य करणारे कामगार नसल्याने कोळसा व मातीचे उत्खनन पूर्णपणे बंद होते. त्यामुळे नाममात्र उत्पादन झाले. कामगारांनी जोरदार घोषणा देऊन केंद्र सरकारचा विरोध केला. दुसऱ्या पाळीतही कामगार हिरीरीने संपात सहभागी झाले होते. संपात इंटक चे आर. शंकरदास, विश्वास साळवे, सुधीर अमराज, आयटक चे दिलीप कनकुलवार, रामलू, एचएमएस चे अशोक चिवंडे, रामचंद्र यादव, सिटू चे गणपत कुडे, शेख जाहिद व शेकडो कामगार सहभागी झाले होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top