Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ट्रकने मारली कट ! टाटा इंट्राने घेतल्या दोन पलट्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रकने मारली कट ! टाटा इंट्राने घेतल्या दोन पलट्या राजुरा-गडचांदूर मार्गावर आर्वी टर्निंग जवळील घटना नशीब बलवत्तर ..... तिघे बचावले...... आम...
  • ट्रकने मारली कट ! टाटा इंट्राने घेतल्या दोन पलट्या
  • राजुरा-गडचांदूर मार्गावर आर्वी टर्निंग जवळील घटना
  • नशीब बलवत्तर ..... तिघे बचावले......
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा येथून गडचांदूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या एका ट्रकने राजुरा-गडचांदूर मार्गावर आर्वी टर्निंग जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा इंट्रा ला कट मारल्याने टाटा इंट्राने दोन पलट्या घेत परत गडचांदूरच्या दिशेने तोंड करत चाकावर उभी झाली. कट मारत ट्रक थोड्या समोर जात नाल्यात गेला. टाटा इंट्रा मध्ये तिघांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांचे प्राण वाचले. सदर घटना आज सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान घडली. 
मिळालेल्या माहितीनुसार टाटा इंट्रा क्रमांक MH 34 BG 8905 चालक योगेश आत्राम रा. पांढरपौनी हे टाटा इंट्रा चे मालक आनंद तावाडे व त्यांच्या पत्नी पामिता तावाडे रा. आर्वी यांना घेऊन राजुरा कडे येत होते. राजुरा कडून गडचांदूरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ट्रक क्रमांक MH 35 AJ 5772 ने आर्वी टर्निंग जवळील दर्गाह जवळ टाटा इंट्रा ला कट मारली. कट मुळे टाटा इंट्रा चे नियंत्रण सुटले व टाटा इंट्रा ने दोन पलटी मारत गडचांदूरच्या दिशेने तोंड करत पुन्हा चाकावर उभी झाली. गाडीत असलेल्या तिघांचे नशीब बलवत्तर होते म्हणून तिघांचे प्राण वाचले मात्र तिघांना किरकोळ दुखापद झाली. ट्रक कट मारत थोडं समोर जात नाल्यात घुसला तिथून ट्रक चालकाने पळ काढला. ट्रक मागून येणाऱ्या काही वाहनचालकांनी सांगितले कि ट्रक चालक भरधाव वेगाने बेजबाबदार पणे ट्रक चालवत होता. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहे.

अपघातास निमंत्रण देत आहे राजुरा-गडचांदूर मार्ग
राजुरा-गडचांदूर मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याच मार्गावर पांढरपौनी गावालगत असलेल्या आर्यन कोल वॉशरीज चा काळ्याकुट्ट धुळा मुळे दि. 16 मार्चच्या रात्री 9 वाजताच्या दरम्यान चुनाळा येथील नितीन सुरेश पिंपळशेंडे हा युवक आपल्या मोटार सायकल ने येत असताना अज्ञात वाहनाचा धडकेत मृत्यु झाला होता. या मार्गावरील पांढरपौनी गावालगत असलेल्या कोल वॉशरीज चा काळ्याकुट्ट धुळामुळे वाहनचालकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांसोबतच इतरही लोकांनी याबाबत तक्रार केली होती. जवळपास एक महिन्याआधी काही सुशिक्षित युवकांनी महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ऑनलाईन रीतसर तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top