Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पर्यटन केंद्र असलेल्या अमलनाला धरणातील गाळ काढून खोलीकरण करा - ईबादुल सिद्दीकी यांची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पर्यटन केंद्र असलेल्या अमलनाला धरणातील गाळ काढून खोलीकरण करा - ईबादुल सिद्दीकी यांची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर...

  • पर्यटन केंद्र असलेल्या अमलनाला धरणातील गाळ काढून खोलीकरण करा - ईबादुल सिद्दीकी यांची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर जवळ असलेल्या अमलनाला धरणातून गाळ काढून खोलीकरण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी पाटबंधारे विभागा कडे केली आहे. चंद्रपूर येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते ईबादूल सिद्धीकी यांनी 29 मार्च ला अमलनाला धरणांमधून गाळ काढून खोलीकरण करण्याबाबत कार्यकारी अभियंता श्याम काळे, उपविभागीय अभियंता दिनेश मदनकर, शाखा अभियंता सय्यद अमीर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली व येत्या उन्हाळ्यात धरणांमधून गाळ काढून खोलीकरण करण्याबाबत चा प्रस्ताव तयार करण्याचे निवेदन दिले आहे.
1985 मध्ये तयार करण्यात आलेल्या अमलनाला धरणामुळे औद्योगिक विकास झाला तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निसर्गाच्या सानिध्यात असल्याने अमलनाला धरणाला महत्त्व आले आहेत व आता पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहेत, आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने करोडो रुपये ची विकास कामे सुरू आहे, 
धरणाच्या निर्मिती पासून आजपावेतो धरणातून गाळ काढला नाही, तेव्हा गाळ काढणे आवश्यक आहे. गाळ काढून खोलीकरण केल्यास पाणीसाठा वाढेल, तेव्हा पाटबंधारे विभागाने याकडे  तातडीने लक्ष देऊन धरणांमधून गाळ काढून खोलीकरण करावे व निघालेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्दीकी यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व मंत्री तसेच लोकप्रतिनिधी कडे केली आहे. 2018 मध्ये अमलनाला धरणाला पर्यटन केंद्र चा दर्जा मिळाला आहे, पर्यटन विकास साठी 7 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, व टप्प्या टप्प्याने विकास कामे पूर्ण केली जात आहेत.
आता उन्हाळ्यात या धरणाचे खोलीकरण केले तर येणाऱ्या पावसाळ्यात धरणातील पाणीसाठा वाढेल यात शंकाच नाही. सध्या या धरणातून 8417 हेक्टर कृषी क्षेत्र ओलित होत आहेत, खोलीकरण केल्यास कृषी क्षेत्रात सुद्धा वाढ होईल. पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उन्हाळ्यात अमलनाला धरणांमधून गाळ काढून खोलीकरण करावे अशी मागणी केली जात आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top