Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आरोग्य शिबीर जनसेवेचे उत्तम माध्यम - डॉ.मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरोग्य शिबीर जनसेवेचे उत्तम माध्यम - डॉ.मंगेश गुलवाडे भारतीय जनता पार्टी महानगर वैदकीय आघाडी तर्फे निःशुल्क रोगनिदान शिबिर संपन्न आमचा विदर्...

  • आरोग्य शिबीर जनसेवेचे उत्तम माध्यम - डॉ.मंगेश गुलवाडे
  • भारतीय जनता पार्टी महानगर वैदकीय आघाडी तर्फे निःशुल्क रोगनिदान शिबिर संपन्न
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वार्ड बंगाली कॅम्प येथील डंपिंग यार्ड येथे भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर वैदकीय आघाडी तर्फे महिला स्वच्छता कर्मचारी यांच्या साठी निःशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की आरोग्य रोगनिदान शिबिर हे जनसेवेचे उत्तम माध्यम असून नागरिकांच्या आरोग्या संबंधी समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर आरोग्य रोगनिदान शिबिराचे संयोजक तथा महानगर सचिव रामकुमार अक्कापेल्लीवार यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतो असे त्यांनी यावेळी सांगितले सदर रोगनिदान शिबिरात  इंडीयन मेडिकल असोसिएशन चे सचिव डॉ. अनुप पालिवाल, डॉ.यशकुमार जैन, डॉ. सात्विक गुंडावार, डॉ.अक्षय रागीट, गटनेत्यां जयश्रीताई जुमडे, मंडळ अध्यक्षसंदीप आगलावे, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार, नगरसेवकप्रदीप किरमे, महानगर सचिव राकेश बोमनवार, विकास गोठे, देवा बुरडकर, कविता सरकार, वासना मेहता, माधुरी टेकाम, सुजाता देवगडे, शारदा आंबटकर, नितीशा मुन, लता बक्षे, सविता सपकाळ, ज्योती वाकुलकर, निर्मला एकोणकार, गीता मेंढे, किरण वाकुलकर, उषा बागडे, संगम भडके, सोनी सिंग, शशिकला उईके, राधिका राजीडवार, छाया कातकर, माया कार्लेकर, भावना सोरदे, चंदा गेडाम, भागमती निषाद, गीता बोबडे, रेखा चामेवार, छाया आत्राम, मंगला पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर स्वच्छता महिला कर्मचारी यांच्या रक्तदाब,मधुमेह तपासणी करून रोगनिदान शिबिरात औषधी उपलब्ध करून देण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top