Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्ह्यात 25 गांडूळखत प्रकल्प
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्ह्यात 25 गांडूळखत प्रकल्प जिप कृषी सभापती सुनील उरकुडे यांनी जिल्ह्यात राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनि...

  • जिल्ह्यात 25 गांडूळखत प्रकल्प
  • जिप कृषी सभापती सुनील उरकुडे यांनी जिल्ह्यात राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
चंद्रपूर जिल्ह्यात जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी पदाचा भार संभाळल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केलेत. मागील अडीच वर्षांपासून अधिक काळात कोविड 19 मूळे नवीन लेखशीर्षावर निधीची तरतूद करता आली नसल्याने काही उपक्रम राबविता आले नसले तरी त्यांच्या अथक प्रयत्नांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाकरिता 25 लक्ष निधीची तरतूद करण्यात भाग पाडले. या उपक्रमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करिता या प्रकल्पाचा नक्कीच लाभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top