Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रा. विमलताई गाडेकर यांचे साहित्य समजात जागृती निर्माण करणारे - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रा. विमलताई गाडेकर यांचे साहित्य समजात जागृती निर्माण करणारे - आ. किशोर जोरगेवार प्रा. विमल गाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कार्यक्...

  • प्रा. विमलताई गाडेकर यांचे साहित्य समजात जागृती निर्माण करणारे - आ. किशोर जोरगेवार
  • प्रा. विमल गाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
प्रा. विमलाताई गाडेकर यांनी आपल्या काव्य रचनेतून समाजात जागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर सह विदर्भातील सामाजिक आणि साहित्यक चळवळीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. आपल्या सामाजिक चळवळीतून त्यांनी अनेक कुटंबांना उभे केले. त्यांचे साहित्य समाजात जागृती निर्माण करणारे असून त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांचे विचार नेहमी समाजा पर्यंत पोहचत राहिल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व कवीयत्री प्रा. विमल गाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज शनिवारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात विमल दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भगवान गाडेकर, बबन सराडकर, डॉ. वामन रामटेके, डॉ. प्रतिभा वाघमारे, डॉ. रजनी हजारे, डॉ. शरदचंद्र सालफळे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ जोरगेवार म्हणाले कि, प्रा. विमलताई गाडेकर यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्या आंबेडकरी विचारांनी प्रेरित होत्या. यातूनच त्यांनी महिला अत्याचारा विरोधात लढा उभारला आपल्या काव्य रचनेतून त्यांनी महिलांमध्ये जागृती निर्माण केली. परितक्त महिलांचे पूनरर्वसन करण्यासाठी त्यांनी संयुक्त महिला मंचाची स्थापणा केली. या मंचाच्या माध्यमातून महिला अत्याचारा विरोधात आवाज उचलून महिलांना न्याय मिळवून दिला. त्याच्या या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पूरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top