Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आंतरराज्यीय गांजा माफियांकडून १०३ किलो गांजा जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आंतरराज्यीय गांजा माफियांकडून १०३ किलो गांजा जप्त 41 लाखाचा रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चंद्रपुर - आज शनिवार दि.२६/...

  • आंतरराज्यीय गांजा माफियांकडून १०३ किलो गांजा जप्त
  • 41 लाखाचा रुपयांचा मुद्देमाल जप्त
  • स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपुर -
आज शनिवार दि.२६/०३/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातुन आंतरराज्यीय गांजा तस्कर दोन चारचाकी वाहने पर राज्यातून गांजा घेऊन चंद्रपुर शहराचे दिशेने येणार या माहितीवरून मा. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. संदीप कापडे, सचिन गदादे यांचे नेतृत्वात दोन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. त्यानुसार सापळा रचुन संशयीत वाहनांवर मुल-चंद्रपुर रोडवर चिचपल्ली गावजवळील शेर-ऐ पंजाब ढाब्याजवळ पाळत ठेवली असता काही वेळातच होंडा सिटी गाडी व मारुती स्विफ्ट (1) Honda city AP 9 BE 1122 2) Swift maruti AP10 AB 2769) गाडी या दोन गाड्या शेर-ऐ-पंजाब ढाव्याजवळ आल्या असता सापळा कारवाई नुसार वाहन चालकांना बाहेर उतरवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) श्रीनिवास नरसय्या मचेडी, वय ५० वर्ष, धंदा-शिक्षक, व २) शंकर बलय्या घंटा, वय २९ वर्ष, धंदा-मजुरी दोन्ही राहणार मस्जीद वाडा, सुभाषनगर, मथनी, करीमनगर, तेलंगणा अशी सांगितली. त्यांचे वाहनांची दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता दोन्ही वाहनांमध्ये मिळुन एकुण ५१ पाकिटांमध्ये मिळुन १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१,१५,१७०/- रुपयांचा गांजा मिळुन आला.
आरोपीतांविरुद कलम तसेच सदर गांजा वाहतुकीकरीता दोन वाहने कि. अं. १०,००,०००/- रु. असा एकूण ४१,१५,१७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीतांविरुद कलम ८(क), २०(ब)(II) (क) एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे रामनगर करीत आहे.
सदर कार्रवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे सोबत स.फौ. राजेंद्र खनके, रमेश तोकला, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, संजय आतकुलवार ना. पो. शि. सुभाष गोहोकार, सुरेंद्र महंतो, पो. शि. गणेश भोयर, मिलींद जांभुळे, गणेश मोहुर्ल, सतिश बगमारे, गोपीनाथ नरोटे, रविंद्र पंधरे,प्रांजल झिलपे, शेखर आसुटकर यांचा सहभाग होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top