- नरेशबाबु पुगलिया यांच्या मध्यस्थीने मृतक कामगारच्या परिवाराला मिळाला न्याय
- मृतकांच्या परिवाराला 5 लाख तर जखमी कामगाराला मिळाली 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
मराठा अंबुजा सिमेंट उपरवाही येथील कंत्राटी कामगार भाऊराव महादेव डाखोरे व संतोष हरी पवार हे दोन्ही कामगार गडचांदूर वरुन कामावर जात असताना दि. २२ मार्च २०२२ मंगळवार ला सकाळी ८.३० च्या दरम्यान सना पेट्रोल पंपा जवळ केटीसी कंपनी च्या ट्रक क्रमांक TS 01 UC 0225 च्या वाहनाने धडक दिली. यात दुचाकीस्वार भाऊराव डाखोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर संतोष हरी पवार हे गंभीर जखमी झाले.
आपल्या साथी कामगाराच्या मृत्यूने कामगारांत प्रचंड आक्रोशित झालेल्या कामगाराने मृत्काचा शव केटीसी ह्या कंपनीच्या ऑफिस पुढे ठेऊन अंनदोलन करत मृत्यु झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याकरिता आंदोलन पुकारले होते. केटीसी कंपनी ने तत्काळ स्वरूपात 1 लाख रुपयांची मदत दिल्यावरच शव हटवण्यात आले होते. नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वाखालील मराठा कामगार संघटनेने मृतक कामगाराच्या परिवाराला 15 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर वाटाघाटी करत मृतकांच्या कुटुंबियांना 5 लाख तर जखमी कामगाराला 2.5 लाख रुपयांचा धनादेश काल पत्रपरिषदेत प्रदान करण्यात आला. शिवाय, कायद्यानुसार अपघाती मृत्यूचे विविध लाभही मिळणार असल्याचे सांगितले.
या दुर्दैवी प्रसंगी मृतक परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली मराठा कामगार संघटनेने सोबतच शिवानी वडेट्टीवार यांनी विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनाही प्रयत्न करीत होती. त्यामुळे काही विघनसंतोषिनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिवचंद्र काळे व साईनाथ बुचे यांनी केला. पुगलियांच्या नेतृत्वात सुलाखून निघालेल्या कामगारांनी 2 दिवस केटीसी कंपनीचें वाहन लोडिंग बंद केले होते. अखेर व्यवस्थापणेने नमते घेत मृतक कामगाराच्या परिवाराला 5 लाख तर जखमी कामगाराला 2.5 लाख रुपयांची मागणी मान्य केल्याचे पत्रपरिषदेत स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात आज मराठा सिमेंट कामगार संघटनेच्या कार्यालयात झालेल्या पत्र परिषदेत कामगार नेते तथा जिप. सदस्य शिवचंद्र काळे, L&T कामगार संघटनेचे सरचिटणीस साईनाथ बुचे, मराठा कामगार संघटनेचे सरचिटणीस अजय मानवटकर, कार्याध्यक्ष सागर बलकी, माजी सरपंच गुणवंत तलांडे, गजानन मटाले, मुरलीधर बोडे, वासुदेव बलकी प्रभृती उपस्थित होते.
अंबुजा सीमेंट येथे कार्यरत ठेका कामगार भाऊराव डाखोरे यांच्या पीड़ित कुटुंबियांना अंबुजा ट्रांसपोर्ट नगर हरदोना येथे या पुर्वी झालेल्या अपघातात मरण पावलेल्या पीड़ित कुटुंबियांना DNR ट्रांसपोर्ट कंपनी कडून 4 लाख रुपये ची आर्थिक मदत मिळाली होती. त्या घटनेत मिळालेल्या आर्थिक मदत लक्षात घेत में. केटीसी कंपनी ने पीड़ित कुटुंबास द्यावी ही टीम विजयक्रन्ति कंत्राटी कामगार संघटनेची भूमिका होती. घटनेच्या दुसऱ्या दिवसी विजय ठाकरे व विभागाचे ठेका कर्मचारी यांच्या समक्ष में. केटीसी ट्रांसपोर्ट कंपनी ने तो प्रस्ताव स्वीकारही केला होता. पण दूसरी संघटना 15 लाख रुपये मदत मिळावी यासाठी आग्रही होती. तेव्हा मृत्यु प्रकरणात आपन राजकरण करू नये अशी भूमिका घेत आम्ही शांत राहन्याचा निर्णय घेतला . शेवटी ५ लाख रुपयेच मदत मिळाली . तरीही ज्यांना आरोप प्रत्यारोप करण्याचे राजकारण करायचे आहे करावे . मृत्यु प्रकरणात टीम विजयक्रन्ति राजकारण मुळीच करणार नाही.
- बबन आत्राम, महासचिव, विजयक्रांती कामगार संघ








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.