Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: स्व.शंकरराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्य विविध कार्यक्रम संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्व.शंकरराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्य विविध कार्यक्रम संपन्न देशमुख परिवारातील तीन पिढ्यांचे तीन कवी यांनी तयार केलेल्या कविता संग्...

  • स्व.शंकरराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्य विविध कार्यक्रम संपन्न
  • देशमुख परिवारातील तीन पिढ्यांचे तीन कवी यांनी तयार केलेल्या कविता संग्रह "हेमंती कृष्ण" चे प्रकाशन
  • शंकरराव देशमुख जन्मशताब्दी विषेशांक "शंकरावलोकन" विशेषांकाचे प्रकाशन
  • ज्येष्ठ नागरिक, माजी आमदार, नगराध्यक्ष यांचा केला सत्कार
  • गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटनांचा सत्कार
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
हैदराबाद मुक्तीसंग्राम लढाईतील स्वातंत्र संग्राम सैनिक तथा राजुराचे माजी आमदार स्व. शंकरराव सितारामपंत देशमुख यांचे २०२२ हे जन्मशताब्दी वर्ष असून राजुरा शहरात शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा घेत, विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, जन्मशताब्दी विशेषांकाचे लोकार्पण, देशमुख कुटुंबातील तीन पिढ्यांचे तीन कवी यांचा कविता संग्रह प्रकाशन, गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संघटनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नरेश पुगलिया, माजी खासदार चंद्रपूर हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, विठ्ठलराव धोटे हे माजी आमदार उपस्थित होते. नागपूर येथील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.म.न. पोटभरे, माजी नगराध्यक्ष विलास बोनगीरवार, स्वामी ये्रोलवार, प्रेमिला बारसागडे, आरती चिल्लावार, राजुरा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बि.यु. बोर्डेवार, एजाज अहमद, माजी जिप सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, आरपीआय (ए) नेते सिद्धार्थ पथाडे, विनायक देशमुख, विनोद देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. शंकरराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व वंदेमातरम गायन घेऊन, अल्का सदावर्ते व संच यांचे स्वागत गीत, विध्यार्थीनीचे स्वागतपर नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी देशमुख परिवाराचा कौटुंबिक कार्यक्रम तीन पिढ्यांचे तीन कवी यांनी तयार केलेल्या कविता संग्रह हेमंती कृष्ण याचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विनोद देशमुख यांनी तयार केलेले स्व. शंकरराव देशमुख जन्मशताब्दी विशेषांक शंकरावलोकन याचे प्रकाशन गीता मुजुमदार, प्रसिद्ध साहित्यिक,नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, माजी आमदार, माजी नगराध्यक्ष यांचा सत्कार, विविध सामाजिक संघटनांचा सत्कार, उत्कृष्ट रक्त रक्तदाता यांचा सत्कार, नीट, JEE, नेट, सेट वन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच एक दिवशीय टेनिस बॉल सुपर लीग क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण, रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, भव्य मॅरेथॉन स्पर्धा आदी स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद देशमुख व रेणुका देशकर यांनी केले. प्रस्ताविक विनायक देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन एजाज अहमद यांनी केले तर बक्षीस वितरण पुरस्कार सोहळ्याचे संचालन प्रा.बी.यु. बोर्डेवार यांनी केले. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात स्व.शंकरराव देशमुख यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. यांचा जन्म २५ मार्च १९२२ रोजी राजुरा येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यानंतर स्वातंत्र आंदोलनात व निजामाच्या रझाकार विरुद्ध लढा दिला. यावेळेस त्यांना आसिफाबाद येथे जेल मध्ये कारावास भोगावा लागला.  राजुरा नगर परिषदेचे तेवीस वर्षे नगराध्यक्ष पद भूषविणारे आणि त्यानंतर विधानपरिषदेचे आमदार राहिलेले स्व. शंकरराव देशमुख यांचा राजुरा शहराची पायाभरणी करण्यात महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याची नवीन पिढीला माहिती व्हावी, या दृष्टीकोनातून राजुरा शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून २०२२ हे वर्षे शंकरराव देशमुख यांचे जन्मशताब्दी महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. स्व. शंकरराव देशमुख जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या माध्यमातून राजुरा तालुका पत्रकार संघ, राजुरा पत्रकार असोसिएशन यासह विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, नागरिक, महिलांनी स्पर्ध्येत मोठया प्रमाणात सहभागी होऊन अथक परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top