Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्री शिवाजी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सुब्बई येथे समापन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मार्गदर्शन करतांना विरुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल चव्हाण श्री शिवाजी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सुब्बई येथे समापन आमचा वि...
मार्गदर्शन करतांना विरुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल चव्हाण

  • श्री शिवाजी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सुब्बई येथे समापन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
सुब्बई येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळा सुब्बई येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे  "ग्राम विकासासाठी युवाशक्ती" या संकल्पनेवर आधारीत विशेष श्रमसंस्कार शिबीर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा, राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य भिमय्या अंगलवार यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी आश्रमशाळा सुब्बई चे मुख्याध्यापक दादाजी झाडे  उपस्थित होते. तसेच या उद्घाटन कार्यक्रमास या संस्थेचे सचिव अविनाश जाधव, संचालक साजिद बियाबानी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉ आर आर खेरानी, IQAC चे समन्वयक डॉ मल्लेश रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅली, पथनाट्ये,शोषखड्डे निर्मिती, बंधारा बांधणे श्रमदानातून स्वछता च्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देने व ग्राम विकासासाठी युवाशक्ती यातूनच राष्ट्र निर्मितीसाठी युवक तयार होतील सोबतच स्वच्छ भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान सहभागी विध्यार्थ्यांना प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हा या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा प्रमुख उद्देश होता. खेळ, कवायत व योग साधनेसोबतच सुदृढतेचे धडे देणे व सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान प्रभोधनाच्या माध्यमातून सहभागी विध्यार्थ्यांनपर्यन्त पोहचवणे यासाठी रोज सकाळी योगनृत्याचे, सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आलेले होते.
या शिबीरात प्रबोधनाच्या सत्रात सहभागी विद्यार्थाना, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील प्रा. श्याम हेडाऊ यांनी "ग्राम विकासासाठी युवाशक्ती", राजुरा येथील उपविभागीय वनअधिकारी अमोल गर्कल यांनी "जलसंवर्धन काळाची गरज", विरुर येथील ठाणेदार राहुल चव्हाण यांनी "वाढती गुन्हेगारी आणि आजचा युवक", राजुरा तहसील चे नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी "निष्पक्ष निवडणूका आणि युवकांचा सहभाग" अशा विविध विषयावर प्रबोधनपर व्याख्याने देवून सहभागी विद्यार्थ्यांपर्यंत वरील विषयांचे ज्ञान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पोहचवले.
या शिबीरात श्रमदानाच्या सत्रात सुब्बई येथून चार किलोमीटर दूरवर असलेल्या जंगलातील नाल्यावर जलसंधारणासाठी एक बंधारा, शिवाजी आश्रमशाळा परिसरातील सार्वजनिक पाणीपुरवठा टाकी परिसरात शोषखड्ड्याची निर्मिती, फुटलेली पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी खड्डे करून दिले, ग्रामस्वच्छता आदी कामे करण्यात आली.
या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून शेतकरी आत्महत्या, एड्स जनजागृती, मतदान जनजागृती, स्वच्छ भारत अभियान, हागणदारीमुक्त गाव, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, बेकारी निर्मूलन, स्त्री -भ्रुण हत्या, सुदृढ भारत समृध्द भारत आदी विषयांवर पथनाट्य सादर केली व गावात प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन बिमा, प्रधानमंत्री उज्वला योजना, पारंपरिक ऊर्जास्रोत, जलसंवर्धन, प्लॅस्टिक फ्री इंडिया, ग्रीन व्हिलेज, कोविड लसीकरण जनजागृती, विजेची बचत, कॅशलेस इंडिया, डिजिटल इंडिया, HIV जनजागृती, प्रौढ साक्षरता, लिंग समानता, मतदान जनजागृती अशा विविध विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. हे शिबीर ग्राम विकासासाठी युवाशक्ती या संकल्पनेवर आधारीत असल्याने यासाठी युवकांना प्रेरणादायी ठरेल अशा विविध विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या मनोरंजनाच्या सत्रात सहभागी विध्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या, एड्स जनजागृती, मतदान जनजागृती, बेकारी निर्मूलन, स्त्री -भ्रुण हत्या, स्वच्छता अभियान, सुदृढ भारत समृध्द भारत, एक भारत श्रेष्ठ भारत आदी विषयांवर पथनाट्य सादर केली. सहभागी विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे मनोरंजन केले.
तसेच शिबीराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीववृंद ,शिवाजी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारीवृंद, जि.प. शाळा चे शिक्षक वृंद, सुब्बई येथील प्रदीप बोटपल्ले तसेच इतर प्रतिष्ठित नागरिक आदींचा समावेश आहे. समारोप कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते शिबीरात सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, डॉ. सारिका साबळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. चेतना भोंगाडे, डॉ नागनाथ मनुरे, प्रा. विठ्ठल आत्राम सहाय्यक समितीचे सदस्य डॉ. आनंद रायपुरे, प्रा. सुवर्णा नलगे, डॉ. राजेंद्र मुद्दमवार, डॉ प्रमोद वसाके, स्वयंसेवक प्रतीक डाखरे सोबतच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top