Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संत लहरी बाबा यांच्या जन्मशताब्दी निमित्त पादुका पूजन सोहळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संत लहरी बाबा यांच्या जन्मशताब्दी निमित्त पादुका पूजन सोहळा संपन्न भाविकांनी घेतला पादुका दर्शनाचा लाभ विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनि...


  • संत लहरी बाबा यांच्या जन्मशताब्दी निमित्त पादुका पूजन सोहळा संपन्न
  • भाविकांनी घेतला पादुका दर्शनाचा लाभ
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शहरात संत शिरोमणी लहरी बाबा जन्मशताब्दी वर्ष सोहळा निमित्य सद्गुरु लहरीबाबा यांच्या पादुका पूजनाचा सोहळा नक्षत्र हॉल येथे संपन्न झाला. गोंदिया तालुक्यातील ग्राम कामठा येथील संत शिरोमणी लहरी बाबा यांनी अध्यात्मिक क्षेत्रात तसेच आपले समाजातील अंधश्रद्धा अज्ञान व जुन्या सामाजिक रूढी परंपरा समाप्त करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी बहुमोल कार्य सुरू केले होते, यांच्या या कार्याचा उंच तुरा आजच्या या समाजातील प्रत्येक श्रीमंत व गरीब जनतेने आपल्या काळजात रोवावा याकरिता प.पू.संत लहरी बाबा जन्मशताब्दी निमित्याने पादुका पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संत लहरीबाबा यांच्या पादुका पंढरपूरची वारी करत डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या अप्रतिम सजावटीत भजनात, टाळ, मृदंगाच्या गजरात या पालखीचे आगमन झाले पादुका पूजनानंतर संत लहरी आश्रम ट्रस्ट कामठा चे डॉ.खिलेश्वरनाथ उर्फ तुकड्या बाबा यांनी सरळ, सोप्या व अत्यंत मार्मिक शब्दात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच काही जवळपासच्या ग्रामीण भागातून आलेले त्यांचे सेवेकरी व भाविक तसेच राजुरा शहरातील तमाम जनतेला अंधश्रद्धा,रुढी परंपरेवर मात करून सामाजिक बांधिलकीची जोपासना होण्याकरीता "माणुसकीला जपा "असा मंत्र दिला. भजनांच्या माध्यमातून संपूर्ण भाविक सभागृहात मंत्रमुग्ध होऊन "जय लहरी जय मानव" चा नारा देत चित्ततल्लीन झाले तसेच प्रा.संजय दानव यांनी संत लहरी बाबा जन्मशताब्दी महोत्सवाबद्दल वर्षभरात होणाऱ्या कार्यक्रमाला हजारो भाविक मोठ्या संख्येने या महोत्सवाचा लाभ घेतील या उद्देशाने कार्यक्रमाचा तपशील सर्व अनुयायी तथा भाविकांसमोर सादर केला. 
काही मान्यवरांचे अनुभवकथन झाले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड संजय धोटे लहरी आश्रम कामठाचे ट्रस्टी यांनी केले. महाआरती डॉ.अर्पित धोटे सह संपूर्ण धोटे कुटूंबियांनी अर्पण केली महाआरती झाल्यावर सर्व भाविक जनतेनी संत लहरी बाबांच्या पादुकांचे दर्शन घेऊन महाप्रसादा घेतला.
यावेळी उपस्थित ॲड अनिल ठाकरे कायदेशीर सल्लागार श्री लहरी आश्रम कामठा, प्रा.संजय दानव पावर बँक,बालाघाट येथील तुलसीजी तसेच गुणवंत जाधव नागपूर आकाशवाणी रेडिओ स्टेशन,तथा संपूर्ण भजनी मंडळ तसेच लहरी सेवा समिती चंद्रपूर,लहरी युवा मंच चंद्रपूर यांचे हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी उपस्थित मान्यवर सुधीर धोटे, सतिश धोटे, ॲड संजय धोटे यांनी परिश्रम घेतले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top