Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पापा जाधव हत्याकांडात मोठी कारवाई; पाचही आरोपी न्यायालयीन कोठडीत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
झाडावर गोळ्यांच्या खुणा, चार अग्निशस्त्रे, सहा जिवंत काडतुसे आणि गोळ्यांचे आवरण जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ३१ ऑगस्ट २०२६) -  ...
झाडावर गोळ्यांच्या खुणा, चार अग्निशस्त्रे, सहा जिवंत काडतुसे आणि गोळ्यांचे आवरण जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ३१ ऑगस्ट २०२६) -
        राजुरा शहरातील न्यायालयासमोर २४ ऑगस्ट रोजी झालेल्या पापा जाधव हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला असताना, या प्रकरणात पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना आज, ३१ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने सर्व पाच आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

        पापा जाधव हत्याकांडातील आरोपींना न्यायालयात आणताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. न्यायालय परिसरासह पुण्यश्लोक अहिल्याबाई चौक, संविधान चौक तसेच न्यायालय ते राजुरा पोलीस ठाणे या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले.

        या प्रकरणात राजुरा पोलिसांनी कार्तिक खामनकर, करण मेकलवार, परवेझ शेख, करण बाविस्कर आणि सौरभ खामनकर या पाच आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने यापूर्वी सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी ३१ ऑगस्ट रोजी संपल्याने पोलिसांनी आरोपींना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले.

        दरम्यान, पोलिस तपासात हत्याकांडाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, करण बाविस्कर, करण मेकलवार आणि परवेझ शेख या तिघांनी राजुराजवळील जंगल परिसरात गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जंगलातील एका मोठ्या झाडाला लक्ष्य करून चार राउंड फायर करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता झाडावर गोळ्यांच्या खुणा तसेच तीन गोळ्यांचे आवरण आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले असून, या दिशेनेही तपास सुरू आहे.

        विशेष म्हणजे, राजुरा पोलिसांनी या हत्याकांडाच्या तपासाला वेग देत घटनेत वापरण्यात आलेले अग्निशस्त्र ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर आणखी तीन अग्निशस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. घटनेत वापरलेल्या अग्निशस्त्रातून दोन जिवंत काडतुसे, तर अन्य तीन अग्निशस्त्रांसोबत चार जिवंत काडतुसे मिळून एकूण सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

        हत्याकांडाच्या तपासात शस्त्रसाठा, जिवंत काडतुसे आणि जंगलात झालेल्या गोळीबाराच्या सरावाचा तपशील समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. आता या हत्याकांडामागील नेमका उद्देश, कटामध्ये कोणाची भूमिका होती आणि शस्त्रांचा वापर कशाप्रकारे करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

       राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलेल्या पाचही आरोपींकडून तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे राजुरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

#PapaJadhav #PapaJadhavMurderCase #Rajura #RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #MaharashtraNews #RajuraPolice #CrimeNews #CrimeNewsMaharashtra #MurderCase #PoliceInvestigation #BreakingNews #LatestNews #MarathiNews #VidarbhaNews #RajuraCrime #ChandrapurCrime #PoliceAction #MaharashtraCrime

हि बातमी वाचली का? नसल्यास बातमीच्या शिर्षकावर क्लिक करा 

About Author

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top