Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अंशकालीन स्त्री परिचरांचे एकत्रित वेतन १० हजार रुपये करावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंशकालीन स्त्री परिचरांचे एकत्रित वेतन १० हजार रुपये करावे आमदार सुभाष धोटे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्र...

  • अंशकालीन स्त्री परिचरांचे एकत्रित वेतन १० हजार रुपये करावे
  • आमदार सुभाष धोटे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या ठिकाणी नर्सेसना मदतनीस म्हणून काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांची (PTLA) अवस्था निव्वळ वेठबिगारासारखी आहे. पूर्णवेळ काम करीत असूनही त्यांना अर्धवेळ किंवा अंशकालीन म्हटले जाते हा त्यांच्या वरील अन्याय म्हणावा लागेल. तसेच त्यांना मिळणारे मासिक एकत्रित वेतन फक्त ३००० असून यातूनच त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. मात्र प्रवासभत्ता मिळत नाही. गणवेश दिला जात नाही आणि रजा- सुट्यांचा लाभही मिळत नाही. खरं म्हणजे स्त्री परिचरांच्या एकूण कामाचे स्वरूप बघता त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत त्यांच्या पात्रते प्रमाणे वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदावर सामावून घेणे न्यायोचित आहे. कारण या महिलांनी अत्यल्प वेतनावर दीर्घकाळ आरोग्य सेवा बजावलेली आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत या स्त्री परिचरांनी जोखीम पत्करून आरोग्य सेवा केली आहे. म्हणून त्यांना अन्य घटकाप्रमाणे प्रथम लॉकडाऊनच्या काळापासून रूपये १०००/- प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.
तसेच सदरील स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ पदावर सामावून घ्यावे. मात्र, तूर्त त्यांना मासिक एकत्रित वेतन रूपये १८००० रुपये द्यावे आणि तातडीने मा. आरोग्य संचालकांच्या शिफारसी नुसार रू.१०००० एकत्रित वेतन देण्यात यावे अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी सुरेश खाडे, किरण पांचाळ, सविता जाधव, भारती रायपूरे, वर्षा उराडे आदिंची उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top