Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अम्बुजा फाऊंडेशन तर्फे प्रशिक्षित व नौकरीत स्थायी असलेल्या मुलींचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अम्बुजा फाऊंडेशन तर्फे प्रशिक्षित व नौकरीत स्थायी असलेल्या मुलींचा सत्कार धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - पुरूषांपेक्षा ...

  • अम्बुजा फाऊंडेशन तर्फे प्रशिक्षित व नौकरीत स्थायी असलेल्या मुलींचा सत्कार
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
पुरूषांपेक्षा महिलांची सहनशीलता जास्त असून दिलेली कोणतीही जबाबदारी संपूर्ण तन्मयतेने पार पाडीत असतात. यांचाच प्रत्यय कोरोना संसर्गजन्य महामारीच्या तिव्र लॉकडाऊन आणि शारीरिक अंतराच्या काळात अम्बुजा फाऊंडेशन उपरवाहीच्या औद्योगिक कार्यशाळेत विविध विषयांत प्रशिक्षण घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातून  प्रज्ञा तावाडे, पुणे येथे कोमल चुनारकर, पुणे येथे प्रशिका बांबोडे, पुणे येथे प्रणाली सोनटक्के, मुंबई येथे सांची उमरे, मुंबई येथे भाग्यश्री कुमरे, पुणे येथे प्रज्ञा येमूलवार, पुणे येथे अश्विनी बोधे, पुणे येथे अमृता टेकाम, पुणे येथे  कोमल गेडाम, हैदराबाद येथे शिवानी सातपुते, मुंबई येथे स्वताच्या पायावर उभ्या राहून कार्यरत आहेत.
मुलींना समानता आणि प्रोत्साहन मिळावे तसेच मुलींच्या बाबतीत असमानतेची वागणूक, भावना न ठेवणाऱ्या यांच्या पालकांचा सहभाग व आनंद द्विगुणित करण्यासाठी अम्बुजा फाऊंडेशन उपरवाहीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  वरील महिला विद्यार्थीनीचा स्मृती चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुनिता खडसे ह्या होत्या. बक्षीस वितरण सन्माननीय अतिथी च्या हस्ते करण्यात आले, संचालन नरेश सुभे यांनी केले. सदर कार्यक्रमास मंगी, उपरवाही, हरदोना, पिंपळगाव, नारंडा, बेलगाव, हिरापूर इत्यादी भागातील महिला सरपंच आणि गावातील उपस्थिती वाखाणण्याजोगी होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top