आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा-गडचांदूर मार्गावर पांढरपौनी गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. १६ मार्चच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार नितीन सुरेश पिंपळशेंडे वय 33 वर्ष, रा.चुनाळा हा मागील 15 दिवसापासुन घुग्घुस येथे मजुरीचे कामासाठी गेला होता. नितीन पिंपळशेंडे हा आपली मोटार सायकल हिरो आय स्मार्ट क्र. MH-34-AY-0692 ने घुग्घुस वरुन गडचांदुर मार्गे राजुरा कडे येत असतांना अंदाजे रात्री ९ वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने अपघात झाला. सुज्ञ लोकांनी ०८ एम्बुलन्स ला फोन करून नितीनला १०८ एम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे उपचाराकरीता पाठविले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात भादंवी १८६० नुसार कलम २७९, ३०४-A, मोटार वाहन अधिनियम, १९५४ १३४B, १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
कोल वॉशरीज चा धुळामुळे वाहनचालकांना त्रास
राजुरा तालुक्यातील पांढरपौनी या गावालगत असलेल्या कोल वॉशरीज चा काळ्याकुट्ट धुळामुळे शेतकऱ्यांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राजुरा-गडचांदूर मार्गावरील पांढरपौनी गावाजवळील कोल वॉशरीज जवळून कोळशाची वाहतूक करीत असतांना कोळसा रस्त्यावर पडल्याने धूळ निर्माण होते. त्या काळेकुट्ट धुरामुळे भर दिवसा समोरील वाहने ने दिसल्याने अपघात घडण्याची शक्यता येथे निर्माण झाली आहे. कोल वॉशरीजचा धुरापासून जवळील शेतकऱ्यांच्या शेतमालाला नुकसान होत असून त्यांना श्वसन संबंधी त्रास होत असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. प्रशासनाने या रस्त्यावरील धुळीवर योग्य उपाययोजना करावी अन्यथा प्रशासन व कोल वॉशरीज विरोधात जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा पांढरपोवनी, चंदनवाही येथील नागरिकांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.