Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "आरोग्य हीच धनसंपदा" इनरव्हील क्लब तर्फे आरोग्य शिवीर संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"आरोग्य हीच धनसंपदा" इनरव्हील क्लब तर्फे आरोग्य शिवीर संपन्न शेकडो महिलांनी घेतला शिवीराचा लाभ आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजु...

  • "आरोग्य हीच धनसंपदा" इनरव्हील क्लब तर्फे आरोग्य शिवीर संपन्न
  • शेकडो महिलांनी घेतला शिवीराचा लाभ
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
जागतिक महिला दिनानिमित्य इनरव्हील क्लब ऑफ राजूरा व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता आरोग्य शिवीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिविरात हिमोग्लोबीन, ब्लड प्रेशर व पैप स्मियर टेस्ट करण्यात आली. शेकडो महिलांनी या शिवीराचा लाभ घेतला.
चिकित्सक डॉ. अनिता अरके, डॉ. माया गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू कुळमेथे, डॉ. अशोक जाधव, परिचारिका रोशनी नगराळे (NCD) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाज सेवक महिला निवृत्त मुख्याध्यापिका स्वाती देशपांडे, संध्या धोटे, नगरसेविका दिपाली हिंगाणे, नगरसेविका उज्वला जयपूरकर, लोकमत सखी मंच अध्यक्षा जयश्री देशपांडे यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक इनरव्हील क्लब ऑफ राजूराच्या अध्यक्षा स्वरूपा झंवर यांनी तर आभार कल्याणी मोहरील यांनी केले. स्वागत गीत शुभांगी वाटेकर, संचालन कृतिका सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुषमा सुब्बा, कल्याणी गुंडावर, राधिका धनपावडे, स्मिता बोनगिरवार, प्राची चिल्लावार, राधा विमलवार यांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top