Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बार मधून एक्सपायरी झालेल्या बियर ची विक्री
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बार मधून एक्सपायरी झालेल्या बियर ची विक्री डिसेंबर मध्ये एक्सपायरी झालेल्या बियर ची मार्च मध्ये विक्री आबकारी विभाग झोपेत चंद्रपूर जिल्ह्याच...
  • बार मधून एक्सपायरी झालेल्या बियर ची विक्री
  • डिसेंबर मध्ये एक्सपायरी झालेल्या बियर ची मार्च मध्ये विक्री
  • आबकारी विभाग झोपेत
  • चंद्रपूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात होत आहे अशी विक्री... वाचा सविस्तर....
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
गडचांदूर -
असे अनेकदा म्हटले जाते की दारू जितकी जुनी असते तितकी छान असते मग प्रश्न पडतो कि त्याला एक्सपायरी तारीख का दिली जाते? याचा अर्थ दारू एक्सपायरी तारीख गेल्यावर पिऊ नये असं होऊ शकते. जिल्ह्यात नेत्यांच्या अथक प्रयत्नांनी दारूबंदी उठली. 
दारूविक्री हटताच लोकही 'पियो जी भर के' म्हणत घोट घेत आहेत. मात्र काही दारू विक्रेते एक नाही, दोन नाही, तब्बल तीन महिने पहिलेच एक्सपायरी झालेल्या बियर ची विक्री करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडिया मध्ये वायरल झाल्याने दारू पिणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तिथेच आबकारी विभाग झोपेत आहे कि काय अशी चर्चा सोशल मीडिया मध्ये सुरु आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार कोरपना तालुक्यातील नांदाफाटा या गावात एका बार मधून एक्सपायरी झालेल्या बियर ची विक्री चा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर होत आहे. जिल्ह्यात अल्पावधीतच दारूचा दुकानांची फळी उभारणाऱ्या एका दारू विक्रेत्याच्या बार मधून एक्सपायरी झालेल्या बियर ची विक्री होत असल्याचे विचारले असता त्यांनी सांगितले कि, सदर माल हा दबल्या गेला असेल. नवीन माल यावर येत असेल म्हणून असे कदाचित झाले असावे. दोन तीन लोकांनी याबद्दल फोनकरून माहिती दिली परंतु याचा काही मोठा प्रोब्लम होत नाही असे दुकानदाराने प्रतिनिधीला सांगितले. 

       बार मधे बिअर पिल्यानंतर लक्षात आले की पिलेली बिअरची एक्सपायरी तारीख संपली होती. नंतर फ्रिज मध्ये बघितले असता तिथे एक्सपायरी झालेल्या बियरच्या बाटल्यासुद्धा होत्या. त्याचा आम्ही व्हिडीओ काढला. जास्त पैसे कमावण्यासाठी दारू दुकानदारांकडून लोकांच्या जीवनाशी खेळण्याच्या प्रकार सुरू आहे. 
नरेंद्र पोचय्या अल्ली, 
माजी ग्राम पंचायत सदस्य, बिबी

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top