Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आपण आत्मनिर्भर झालो तर देश आत्मनिर्भर होईल - किरण बुटले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आपण आत्मनिर्भर झालो तर देश आत्मनिर्भर होईल - किरण बुटले पाककला स्पर्धा व आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांचा सत्कार चंद्रपुर भाजपा आत्मनिर्भर भार...

  • आपण आत्मनिर्भर झालो तर देश आत्मनिर्भर होईल - किरण बुटले
  • पाककला स्पर्धा व आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांचा सत्कार
  • चंद्रपुर भाजपा आत्मनिर्भर भारतचा उपक्रम
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी विविध योजना लागू करीत कौशल्य वृद्धीसाठी मार्ग मोकळा केला आहे. आता फक्त आपल्या इच्छाशक्तीची गरज आहे.लोकनेते आ सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात,जनहिताच्या सर्व योजना शेवटच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचवू. आपण आत्मनिर्भर झालो तर देश आत्मनिर्भर होईल, असे प्रतिपादन चंद्रपूर भाजपा असत्मनिर्भर भारतच्या जिल्हाध्यक्ष किरण बुटले यांनी प्रस्ताविकातून केले. त्या चंद्रपूर भाजपा आत्मनिर्भर भारत व श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातर्फे शनिवार (12मार्च) ला भानापेठ वार्ड येथे जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित 'पाक कला स्पर्धा व आरोग्य शिबिरात बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.मंगेश गुलवाडे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,स्त्रीरोग तज्ञ डॉ. वृषाली बोनगुलवार, डॉ सौ खुशबू गुजराती व ऍड सारिका संदूरकर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले, प्रत्येक व्यक्तींमध्ये एक सुप्तगुण असतो. त्यास वाव मिळाला की कलेचा जन्म होतो. ही कला त्यास आत्मनिर्भर होण्यास मदत करते.
यावेळी पाककलेचा प्रिया पवार यांना प्रथम,रश्मी चिद्दमवार यांना द्वितीय तर रिया निमजे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.परिसरातील किमान 280 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत निशुल्क तपासणी करून घेतली.यावेळी उपस्थित,हेल इन द सेल रोबोवार स्पर्धेतील विजेते अक्षय खनके, सोहम बुटले, सोनू सिंग, वैष्णवी बुटले, सिद्धी तेलंग,टिकांचंद बुटले यांचा तर श्रेया श्रीकांत पवार, रश्मी रतन परिहार, मुस्कान अनुपम भगत यांचाही सत्कार करण्यात आला. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top