Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपुरात नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपुरात नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - रुग्‍णसेवा हीच ईश्‍वर सेवा आहे असे धोरण ठेव...


  • बल्लारपुरात नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
रुग्‍णसेवा हीच ईश्‍वर सेवा आहे असे धोरण ठेवत बल्लारपूर विधानसभेचे आमदार महाराष्ट्राचे माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेने बल्लारपूर येथे नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन सुभाष टॉकीज परिसरात करण्यात आले होते. शिबिरात शेकडो लोकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. ज्यांना नंबर लागला त्यांना चष्मे सुद्धा देण्यात आले. या नेत्र तपासणी शिबिरात काही लोकांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले. अश्या रुग्णांना ऑपरेशन करिता नेण्यात आले. या नेत्र तपासनी शिबिराचा शेकडो गरजु नागरिकांनी लाभ घेतला. 
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, मनीष पांडे, समिर केने, निलेश खरबडे, शैलेंद्रा बेस, माजी नगरसेवक जयश्री मोहुरले, सुवर्णा भंटारकर, आशा संगिडवर, सारिका कणकम, दसराफ एलैया, देवा वाटकर राजू दासरवार व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top