Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्री शिवाजी महाविद्यालयात इतिहास परिषदेचे दोन दिवसीय ५४ वे अधिवेशन संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री शिवाजी महाविद्यालयात इतिहास परिषदेचे दोन दिवसीय ५४ वे अधिवेशन संपन्न आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - श्री शिवाजी कला वाणिज्य व ...

  • श्री शिवाजी महाविद्यालयात इतिहास परिषदेचे दोन दिवसीय ५४ वे अधिवेशन संपन्न
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील इतिहास विभागा द्वारा आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या इतिहास परिषदेचे ५४ वे अधिवेशन दिनांक ११व १२ मार्च २०२२ ला राजुरा येथे पार पडले. या परिषदेचे उद्घाटन दिनांक ११ मार्च ला पार पडले, या परिषदेला उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू मा. डॉ प्रशांत बोकारे उपस्थित होते.
आपल्या उदघाटनपर भाषणात इतिहासाचे लेखन करताना स्थानिक इतिहासासोबतच संपूर्ण इतिहास पाठ्यपुस्तकाच्या स्वरूपात सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य इतिहासाच्या प्राध्यापकांनी करावे, इतिहास विषय नसणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत इतिहास पोहोचवणे हे ही इतिहासाच्या प्राध्यापकाचे काम आहे, आजच्या डिजिटल युगामध्ये सर्वसामान्यापर्यंत पोहोचणे शक्य झालेले आहे, भारत पूर्वीपासूनच शांतताप्रिय देश राहिला आहे, भारताने कधीही कोणत्या देशावर आक्रमण केले नाही मात्र भारतावर प्राचीन काळापासून आक्रमणे होत राहिली आज त्यांचे वाद पाहत असताना त्याला आपण युद्धाचे स्वरूप देत असतो मग भारतावर झालेले आक्रमणे हे युद्ध नव्हती का असेही मत व्यक्त केले. 
या परिषदेला बीजभाषक म्हणून चिस्थिया महाविद्यालय खुलताबाद येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ एच. एन. जमाले यांनी उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय धोटे यांनी उपस्थित राहून विचार व्यक्त केले, इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ संजय ठवळे, परिषदेचे सचिव डॉ गोविंद तीरमनवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून इतिहास परिषदेचा इतिहास, इतिहास परिषदेची कार्यपद्धती आणि मागील अधिवेशनाचा आढावा या ठिकाणी मांडला, या परिषदेला विशेष अतिथी म्हणून डॉ भूपेश चिकटे, प्रमुख उपस्थिती अविनाश जाधव, सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, प्रा. डॉ. श्याम कोरेटी, सहयोगी अधिष्ठाता रा. तु. म. नागपूर विद्यापीठ नागपूर, प्रा. डॉ. रश्मी बंड, प्रा. संतोष बन्सोड हे उपस्थित होते. 
या दोन दिवसीय परिषदेत विविध विषयावर चर्चासत्र, परिसंवाद, शोधनिबंध वाचन असे विविध सत्र घेण्यात आले, आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना स्थानिक इतिहासाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विदर्भाचे योगदान, चंद्रपूरचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास अशा विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद घेण्यात आले यासाठी विदर्भातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपले विचार व्यक्त केले, या परिषदेला विदर्भातील तीनही विद्यापीठातील इतिहास विषयाचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, इतिहासप्रेमी उपस्थित होते.
या परिषदेचा समारोपीय कार्यक्रम १२ मार्च २०२२ ला घेण्यात आला, यावेळी समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधरराव गोडे, प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरराव धोटे, संचालक दत्तात्रय येगीनवार, संचालक दौलतराव भोंगळे, डॉ नितीन चांगोले, परिषदेचे मावळते अध्यक्ष डॉ संजय ठवळे आणि नवे अध्यक्ष डॉ शरद बेलोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर.आर. खेरानी, आईक्यूएसी चे समन्वयक डॉ मल्लेश रेड्डी, इतिहास विभाग प्रमुख तथा परिषदेचे स्थानिक सचिव प्रा. गुरुदास बलकी उपस्थित होते, परिषदेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top