Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान गावातीलच महिला बचत गटाला द्या नांदा ग्रामवासियांची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान गावातीलच महिला बचत गटाला द्या  नांदा ग्रामवासियांची मागणी नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानात कोणत...

  • नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान गावातीलच महिला बचत गटाला द्या 
  • नांदा ग्रामवासियांची मागणी
  • नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानात कोणताही काळाबाजार नसताना केवळ बदनामीचा कट
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान आदर्श महिला परिवार बचत गटाला एक वर्षापासून संलग्नित करण्यात आले होते. त्याबाबत शिधा पत्रिका धारकांच्या कोणत्याही तक्रारी नसून सुरळीतपणे संलग्नित केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून धान्य वितरण होत असताना काही लोकांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि आपल्या मर्जीतील लोकांना दुकान हस्तांतरित केले जावे याकरिता विचित्र उठाठेव करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
कोरपना तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानांच्या कोणत्या ना कोणत्या कारणाला घेऊन तक्रारी करायच्या व ते दुकान आपल्या मर्जीतील लोकांना चालवायला देण्याचे राजकीय षड्यंत्र सुरू केले आहे. आदर्श महिला परिवार बचत गट नांदा येथील शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य देत आहे. जानेवारी महिन्याचे मोफत धान्य वितरण केले नसताना येथील या दुकानाला दुकान कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आले व दुकानदारवरती विविध प्रकारचे आरोप ठेवण्यात आले. हे सर्व आरोप बिनबुडाचे व निराधार आहेत तसेच विकास नुसेटी कनकय्या या शिधापत्रिकाधारकांच्या आधार घेत माझ्यावरती करण्यात आलेला आरोप हा बिनबुडाचा आहे. त्यांना धान्य मंजूर झाले नाही अथवा यांच्या शिधापत्रिका यादी मध्ये नावाचा समावेश झालेला नाही. असे असताना जानेवारी डिसेंबर मध्ये त्याला धान्य दिले नसल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यांच्या नावाचे धान्य मंजूर झालेले नाही, त्यामुळे वाटप करण्याचा किंवा गैरवापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच विशेष म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये मोफत धान्य वितरण आम्ही  केले नाही. असे असताना ही खोटे आरोप करण्यात आले. 14 जानेवारी पूर्वी गोडाऊन वरून वाटपाचे धान्य दुकानात आलेच नाही तर बिल काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे माझ्यावर केलेले आरोप हे खोटे असून केवळ माझ्या बदनामीचा कट राजकीय लोकांकडून करण्यात आलेला आहे असे नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान चालवणाऱ्या महिला शालू विनोद धोटे यांनी केली आहे.

नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान हे विविध कारणांना घेऊन मागील चार ते पाच वर्षापासून चर्चेत असून काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे हे दुकान कधी महिला बचत गट तर कधी आपल्या मर्जीतील रास्त भाव दुकानदारांना संलग्नित करण्यात येत आहे मात्र यासाठी तालुका प्रशासन सुद्धा राजकीय प्रभावाखाली येऊन कार्य करत असल्याचे चिन्ह सध्या तालुक्यात तयार झाले असून सदरचे दुकान हे कोणालाही संलग्न न करता शासकीय नियमाप्रमाणे गावातीलच महिला बचत गटाला चालविण्याकरिता देण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने आम्ही करीत आहोत. 
- प्रकाश बोरकर, उपजिल्हा सचिव मनसे

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top