Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अंबाडा येथे 9 कोटी 40 लाख रुपयांचा कामाचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंबाडा येथे 9 कोटी 40 लाख रुपयांचा कामाचे भूमिपूजन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स वर्धा - अंबाडा गावामध्ये 9 कोटी 40 लाख रुपयांचा कामाचे भूम...
  • अंबाडा येथे 9 कोटी 40 लाख रुपयांचा कामाचे भूमिपूजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
वर्धा -
अंबाडा गावामध्ये 9 कोटी 40 लाख रुपयांचा कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस व माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे उपस्थित होते. या वेळी पंचायत समिती सर्कल प्रमुख चंदन विश्वकर्मा यांच्या तर्फे खासदार रामदास तडस यांना विकास कामा करिता निवेदन देण्यात आले. जिप सदस्य सारंग खोडस्कर व पंस सदस्य रमेश खातदेव व भटक्या विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष कमलसिंग चितोडीया, जिप सदस्त संजय गुलक्षे, जिप सदस्य अनिल डबरासे, तालुका अध्यक्ष देवकुमार बुरंगे, भाजयुमो तालुका अध्यक्ष अजिंक्य लुंगे, व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top