Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कवठाळा आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वितरित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कवठाळा आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वितरित ३८५ लाभार्थ्यांची नेत्र तपासणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर - क...
  • कवठाळा आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वितरित
  • ३८५ लाभार्थ्यांची नेत्र तपासणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
कोरपना तालुक्यातील कवठाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागातर्फे नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिप सदस्य शिवचंद्र काळे होते. तर उद्घाटक म्हणून जिप सदस्य वीणा मालेकर उपस्थित होत्या. कवठाळाचे सरपंच नरेश सातपुते याप्रसंगी उपस्थित होते. या शिबिरात एकूण ३८५ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. कवठाळा व परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बावने, डॉ. तडवी, आरोग्य सहाय्यक खामनकर, आरोग्य सेवक माथनकर, वाघमारे, दुपारे, कुळमेथे आदींनी सहकार्य केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top