- 'मन की बात' हा सामाजिक उपक्रमांची दखल घेणार उच्चस्तरीय कार्यक्रम - डॉ. मंगेश गुलवाडे
- भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने 225 बुथवर 'मन की बात' चा कार्यक्रम संपन्न
गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने विशिष्ट कार्यक्रमाचे आयोजन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय उपक्रमांपैकी मन की बात चा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित करण्यात येत असतो प्रधानमंत्री मन की बात च्या माध्यमातून देशवासीयांसोबत संवाद साधत असतात या मन की बात च्या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर च्या वतीने 225 बुथवर 27 मार्च ला महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असाच एक विशेष कार्यक्रम चंद्रपूर महानगरातील बूथ क्रमांक 45 वर तुकुम येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की मन की बात चा कार्यक्रम सामाजिक उपक्रमांची दखल घेणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अत्यंत लोकप्रिय व उच्चस्तरीय कार्यक्रम असून सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर महामंत्री कासनगोटूवार, मन की बात कार्यक्रमाचे महानगर संयोजक तथा बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ. दीपक भट्टाचार्य, महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा बोरगमवार, उपाध्यक्षा मंजुश्री कासनगोटूवार, मंडळ महामंत्री पुरुषोत्तम सहारे, बूथ प्रमुख वैशाली पांडे, पंचमराव अनमूलवार, रामराव धारणे, सुरेश कनोजवार, अमोल तंगडपलीवार, संजय कोत्तावार, हिमांशू शेंडे, कावेरी मडावी, युवश्री उराडे, संस्कृती कन्नाके, अभ्याम गड्डेवार, चैतन्य ठोमडे, विशाल गुजरकर, प्राजक्ता कामनकर, जानवी कंनाके, मंथन गुरे, उस्नेन सय्यद अली, माही राहुलगडे, सय्यद अली, रजत वडसकर, शुभांगी अनमूलवार, सीताराम इजमलकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर महानगरातील 225 बुथवर मन की बात चा कार्यक्रम यशस्वी केल्यामुळे बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी यांचे कार्यक्रमाचे संयोजक डॉ. दीपक भट्टाचार्य यांनी सदर कार्यक्रमात आभार मानले.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.