एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
वन परिक्षेत्र बल्लारशाह अंतर्गत बॉटनिकल गार्डन विसापुर कक्ष क्र. 579 मधील दिशादर्शक बोर्ड रात्रौच्या दरम्यान चोरीला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता गस्ती दरम्यान दिशा दर्शक लोंखडी पोल लागून नसल्याचे निदर्शनास आले सदर बाब वनरक्षक देवराव टेकाम यांच्या निदर्शनास आली. टेकाम व गार्डन मधील रोजंदारी मजुर यांनी फिरुन शोध घेतला असता दर्गाच्या मागच्या बाजुला दिशादर्शक नाव लिहलेली लोखंडी प्लेट पडलेली दिसली मात्र लोखंडी पोल चोरुन नेले असल्याचे निदर्शनास आले. जवळपास ५० हजार रुपये किमतीचे सदर दिशा दर्शक लोंखडी पोल हे कंत्राटदारा मार्फत लावण्यात आलेले होते. सदर बाब वनक्षेत्र सहाय्यक बल्लारशाह यांना माहितीस्तव सादर करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि १८६० कलम ३७९, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला असून समोरील तपास पोलीस करीत आहे.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.