Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामीण महिला खेळकुद महोत्सव 'उल्हासोत्सव' २०२२ चे आयोजन संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रामीण महिला खेळकुद महोत्सव 'उल्हासोत्सव' २०२२ चे आयोजन संपन्न अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन आवारपूर ने केले होते प्रायोजित...

  • ग्रामीण महिला खेळकुद महोत्सव 'उल्हासोत्सव' २०२२ चे आयोजन संपन्न
  • अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन आवारपूर ने केले होते प्रायोजित
  • सभोवतालच्या १२ गावातील ३६० महिलांनी घेतला सहभाग
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महिला ही प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती करत आहेत, मग ते शिक्षण असो  की खेळ. गावातील महिलांनी सुद्धा पुढे येऊन आपल्याला सिद्ध केले पाहिजेत त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजेत व कुठे तरी त्यांना स्वतंत्र जगता आले पाहिजेत, या अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन, आवारपूर च्या चेअरपर्सन राजश्री बिर्ला मँडम यांच्या संकल्पनेला साकार करण्याकरीता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर व्दारा त्यांना संधी आणि जागा उल्हासोत्सव, २०२२ ग्रामीण महिला खेळ कुद महोत्सव व्दारा उपलब्ध करून देण्यात आली. या दोन दिवसीय  कार्यक्रमात अल्ट्राटेक कंपनी, आवारपूर च्या सभोवतालील १२ गावातील एकूण ३६० महिलांनी सहभाग घेतला होता. या १२ गावामध्ये आवारपूर, बीबी, नांदा,  नोकारी, पालगाव, राजुरगुडा, कोल्हापूर गुडा, तळोधी, बखर्डी, भोयेगाव, हिरापुर व सांगोडा या गावांचा समावेश होता.
उल्हासोत्सव - २०२२ या कार्यक्रमात महिलांकरिता कबड्डी, थ्रो- बाल, रस्सा खेच, १०० मीटर धावणे, लिंबू चमच, व सँक रेस या खेळाचा सहभाग होता. तसेच विशेष आकर्षण म्हणून बैलबंडी झांकी व समुह नुत्य यांचा सुद्धा समावेश होता. सर्व ३६० खेळाडूंना खेळांचे ड्रेस त्यांच्या गावांच्या नावासोबत सी.एस.आर. तर्फे प्रदान करण्यात आले तर सर्व खेळाडू ना येण्या व जाण्याकरीता गाडीची व्यवस्था तसेच चाय, नाश्ता, लिंबूपाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युनिट हेड, श्रीराम पी.एस., संदीप देशमुख, ललित देवपुरा,सी.एस.आर. व्यवस्थापक प्रमुख शिवसंत्रा, संजय पेटकर, सोनाली गवारगुर सर्व ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच तथा सदस्य आणि सर्व विभाग प्रमुख आणि त्यांचा परिवार सुद्धा उपस्थित होता. उल्हासोत्सव महिला खेल-कूद महोत्सव- २०२२ ला यशस्वी करण्याकरिता कर्नल दिपक डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर उल्हासोत्सवला यशस्वी करण्याकरीता सी.एस.आर. अँडमीन, सेक्य़रीटी, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, हार्टीकलचर, ए.बी.पी.एस.टीचर स्टॉप, मेडीकल सेंटर, माईन्स, सेफ्टी, इ. आर यांचे मोलाचे सहकार्य राहिले. पंच म्हणून प्रमोद वाघाडे, किरण त्रीमोती, किशोर उरकुडे व मॅजिक बस यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन सी.एस.आर. प्रमुख  सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top