- वेगळ्या विदर्भाकरिता "सुख समृद्धी चा झरा.. वेगळा विदर्श झालेला बरा" चा उद्घोष
- गडचांदुर येथे शाखा गठीत करून शाखा फलकाचे अनावरण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
जय विदर्भ सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बिसेन यांच्या हस्ते जय विदर्भ सेनेच्या गडचांदुर येथील माणिकगड सिमेंट कंपनी चौकात शाखा गठीत करून गडचांदुर शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी जय विदर्भ सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बिसेन, उपाध्यक्ष विमलालाई रायपुरे, कोषाध्यक्ष महेन्द्रभाऊ पाटील, सचिव नामदेवराव तराळे, कार्याध्यक्ष सुजाताताई रंगारी, सहसचिव मिराताई कटरे, विजयाताई कच्छाव, संध्याताई मडावी, रेशमाताई साखरे, लताताई येवले गीताताई येवले, लतालाई पवार, अनिल आत्राम, राहुल रंगारी, योगीताताई पाटील आदी जय विदर्भ सेनेच्या शेफड़ो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. फलकाच्या अनवरणाच्या निमित्ताने वेगळ्या विदर्भाकरिता "सुख समृद्धी चा झरा.. वेगळा विदर्श झालेला बरा" असे नारे ही देण्यात आले.
वेगळ्या विदर्भाकरिता जय विदर्भ सेना सतत प्रयत्नशील राहील असेही आवाहन जिल्हाध्यक्ष रमेश बिसेन यांनी यावेळी केले.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.