Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदुरात आमदार चषकाचे थाटात उद्घाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदुरात आमदार चषकाचे थाटात उद्घाटन राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल संघांचा समावेश धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - आमदार...
  • गडचांदुरात आमदार चषकाचे थाटात उद्घाटन
  • राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल संघांचा समावेश
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकारातून दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब गडचांदूर व भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर येथे राष्ट्रीय स्तरावरील वालीबाल सामन्यांचे आमदार चषक आयोजित करण्यात आले असून नुकताच उद्घाटन सोहळा पार पडला.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आमदार चषक - २०२२ चे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत महिला व पुरुष असे दोन गट करण्यात आले असून महिला गटात देशातील पुणे, जबलपुर, आग्रा, पंजाब, गुजरात, चंद्रपूर, यवतमाळ, हैदराबाद, दिल्ली येथील संघांनी सहभाग घेतला आहे. तर पुरुष गटात देशातील कामठी, पंजाब, यवतमाळ, नागपूर, विजयवाडा, विशाखापट्टनम, महाराष्ट्र स्पायकर, हैदराबाद येथील संघांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे उपस्थित होते तर स्वागताध्यक्ष म्हणून गडचांदूर येथील नगराध्यक्ष सविता टेकाम उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, शुभांगी धोटे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, गटनेते विक्रम येरणे, नगरसेवक राहुल उमरे, नगरसेविका अर्चना वांढरे, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता चिताडे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर, डॉ. कुलभूषण मोरे विजय डाहूले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, माजी सरपंच शिवकुमार राठी, माजी सरपंच बाबाराव पुरके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे, रोहित शिंगाडे, अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख अहमदभाई, पंडित काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी बोलताना म्हटले की, गडचांदूरसारख्या शहरात पहिल्यांदाच आमदार चषक आयोजित करण्यात आले असून यामुळे शहराचे नावलौकिक झाले आहे. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या व्हॉलीबॉल संघाचे त्यांनी यावेळी स्वागत व कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले तर प्रास्ताविक दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लबचे सचिव विक्की मुन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष विनोद तराळे, भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्थेचे अध्यक्ष राहुल उमरे यांच्यासह सर्व सदस्यांनी सहकार्य केले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top