Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: खंडित पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाचे युद्धस्तरावर प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खंडित पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाचे युद्धस्तरावर प्रयत्न महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली पाहणी मंगळवारी 50 टक्के क्षमतेने, तर ब...
  • खंडित पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाचे युद्धस्तरावर प्रयत्न
  • महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली पाहणी
  • मंगळवारी 50 टक्के क्षमतेने, तर बुधवारी 100% पाणी पुरवठा होणार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
महा औष्णिक विद्युत केंद्राच्या पाईपलाईन कामामुळे लिकेज झाल्याने खंडित झालेला पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत सुरू होईल. मंगळवारी 50 टक्के क्षमतेने, तर बुधवारी 100% पाणी पुरवठा होईल, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, आज सोमवारी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी  पाहणी केली. 
इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन  सिटीपिएसच्या पाईपलाईन कामामुळे लिकेज झालेली आहे. इरई धरण चेकपोस्टजवळच्या नाल्यांमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. इरई धरणावरुन होणारा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी भेट दिली. यावेळी उपायुक्त अशोक गराटे, उपअभियंता विजय बोरीकर यांची उपस्थिती होती. 
आज रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल. मंगळवारी सकाळपर्यंत शहरातील नागरिकांना 50 टक्के क्षमतेने, तर बुधवारी 100 टक्के क्षमतेने पाणीपुरवठा होईल, यासाठी महानगरपालिकेतर्फे कसोशीने प्रयत्न केले जात आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top