Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १५ मे २०२४) -         यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथील बीएस इ...

आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १५ मे २०२४) -
        यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथील बीएस इस्पात कंपनी यांच्या ४० हजार मॅट्रिक टन कोळशाच्या गैरव्यवहार प्रकरणी २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी स्वतः लक्षवेधी सूचना मांडलेली होती. त्यावर मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात उत्तर सादर केलेले आहे. परंतु मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात केलेले निवेदन व आजवर झालेली चौकशी यावर कुठलीही प्रगती दिसून आलेली नाही. याचाच अर्थ असा की जिल्हा खनीकर्म विभाग व खनीकर्म मंत्रालय सुनियोजितरित्या या घोटाळ्याला दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची दाट शंका उपस्थित होत आहे असा आरोप आ. सुभाष धोटे यांनी केला आहे. 

        बीएस इस्पात कंपनी मार्की मांगली मुकुटबन या खाणीचे संचालक व वरिष्ठ उपाध्यक्ष या दोघांनी मिळून यवतमाळ खाणीकर्म विभागाशी आर्थिक साठगाठ करून कोट्यावधी रुपयाच्या राष्ट्रीय संपत्तीची दिवसाढवळ्या चोरी केल्याची बाब प्रत्यक्षात समोर आलेली असताना, पोलिसात तक्रार व गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा या उद्योगपतीला शासन-प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावरून मदत करीत आहे त्याचाही खुलासा झाला पाहिजे यासाठी आ. धोटे आग्रही आहेत. 

बीएस इस्पात चा वरोरा येन्सा येथील विद्युत उत्पादन प्लांट बंदच
        बीएस इस्पात कंपनीला मारकी मांगली मुकुटबन येथे जी कोळसा खाण आवंटित झालेली आहे त्यामधली प्रमुख अट अशी आहे की या खाणी मधून जेवढा कोळसा बाहेर काढण्यात येईल त्यापैकी अर्धा कोळसा व्यावसायिक विक्रीसाठी व अर्धा कोळसा सबसीडराईज रेटवर वरोरा येथील बीएस इस्पात कंपनीच्या पावर प्लांट च्या वापरासाठी ही खाण त्यांना दिलेली आहे परंतु वास्तविक सत्य व धक्कादायक बाब अशी आहे की वरोरा येथील पावर प्लांट हा बंद अवस्थेत असून तो पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही आणि त्यामुळे बीएस इस्पात कंपनीने यापूर्वीच इथल्या साडेतीनशे कामगारांना कामावरून काढून टाकले,  अशा बंद प्लांटमध्ये कोळसा येतोच कसा आणि जर तो कोळसा आलास तर या ठिकाणी आजपर्यंत किती कोळसा एकूण उत्पन्नाच्या पैकी विद्युत निर्मितीसाठी आणण्यात आला व त्यापासून किती विद्युत निर्मिती झाली याची सुद्धा चौकशी विशेष समितीमार्फत होण्याची नितांत गरज आहे कारण राज्य शासन किंवा केंद्र शासन जर बीएस इस्पात कंपनीला सबसिडी रेट चा कोळसा विद्युत निर्मितीसाठी देत असेल आणि हा सबसिडी रेटचा कोळसा बी एस इस्पात कंपनी काळ्या बाजारात जर याची विक्री करत असेल तर ही अतिशय गंभीर बाब असून हा मोठा कोळसा घोटाळा सत्ताधारी लोकांच्या आशीर्वादाने सुरू असल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे. 

पुन्हा १० कोटी रुपये किमतीच्या कोळस्याची अफरातफरी, वरोरा पोलिस स्टेशन ला गुन्हा नोंद
        बीएस इस्पात कंपनीने इंडो युनिक फ्लेम कोलवासरी यांना एकुण ४२२५१.१४ मॅट्रिक टन कोळसा स्वच्छ धुण्यासाठी दिलेला होता. मात्र इंडो युनिक फ्लेम कोलवासरी ने त्यापैकी केवळ १६२१९.३७ मॅट्रिक टन कोळसा स्वच्छ धुवून कंपनीला परत केला. याचाच अर्थ असा की त्यांनी २५०३१.७७ मॅट्रिक टन कोळशाचा घोटाळा केला. बीएस इस्पात कंपनीचे संचालक व वरिष्ठ उपाध्यक्ष हे कोळसा हेराफेरी चे मुख्य सूत्रधार असून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मार्की - मांगली कोळसा खाणी मधून १०० कोटीहून अधिक कोळशाची अपरातपर केली असल्याची खात्रीदायक माहिती आहे. या संदर्भात आपण स्वतः जातीने लक्ष ठेवून आहोत आणि येथे सुरू असलेल्या कोळसा घोटाळाप्रकरणी विधानसभेत पुन्हा लक्षवेधी सूचना मांडून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका आ. सुभाष धोटे यांनी व्यक्त केली आहे.

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#news #breakingnews #chandrapur #yavatmal
#marquee-manglicoalmines #coalmines #coal
#congress #subhashdhote #BSispatcompany
#warorapolicestation #politics
#yensapowergenerationplant

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top