Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अनाथांच्या कल्याणाकरिता कार्य करण्याऱ्या विनायक धांडे यांचे कार्य कौतुकास्पद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनाथांच्या कल्याणाकरिता कार्य करण्याऱ्या विनायक धांडे यांचे कार्य कौतुकास्पद आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स अकोला - अकोला जिल्ह्यात अनाथ, नि...

  • अनाथांच्या कल्याणाकरिता कार्य करण्याऱ्या विनायक धांडे यांचे कार्य कौतुकास्पद
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
अकोला -
अकोला जिल्ह्यात अनाथ, निराश्रित, निराधार, वृद्ध, दिव्यांग आणि आबाल वद्ध यांची सेवा करीत असलेले हसताक्षार कलावंत विनायक काशिराम धांडे यांच्या कार्याची प्रशंसा होताना दिसत आहे. 
आश्रय ध्यानं फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक काशिराम धांडे हे हसताक्षार कलावंत असुन त्यांच्या कलेचा हजारो विद्यार्थी व शिक्षकांनाही फायदा झाला आहे. त्याच बरोबर धांडे अनाथ, निराश्रित, निराधार, वृद्ध दिव्यांग आणि आबालवृद्ध यांची सेवा देखील करीत आहेत. गेल्या अनेक वर्षा त्यांचे हे कार्य उद्दात हेतूने अविरत सुरु आहे. त्यांच्या या कामाची दखल माजी राष्ट्रपती डॉ.ए.पि.जे. अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा घेतली. त्या दरम्यान त्यांच्या सामाजिक कार्याबाबत गौरव ही करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पि.जे. अब्दुल कलाम यांनी धांडेंना अनाथासाठी कार्य स्तुत्य असून ते अधिक उत्कृष्ट करण्याकरिता फाउंडेशन स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी आश्रय ध्यानं फाउंडेशनची स्थापना केली व त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून अनाथांसाठी कार्य करीत आहे. 
मागील दोन वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या काळात अनेक गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षनिक नुकसान झाले. विशेषत: अनाथ मुलांचे तेव्हा धांडेंनी स्वत:च्या घराला कुलूप ठोकले व मे २०२० पासून अविरत जिथं अनाथ-तिथं शाळा म्हणुन गावोगावी डोंगरी तसेच अति दुर्गम भागात जाऊन अनाथ बालकांना त्याच बरोबर शैक्षणिक दुष्टया मागासलेल्या पारधी समाजातील मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून व त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा वयोगटानुसार शिक्षण देत आहे. याकार्यासाठी त्यांना दानशूर व्यक्तींचे सहकार्य मिळत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top