- वृक्षारोपण आजच्या काळाची गरज - अल्ट्राटेक युनिट हेड श्रीराम
- आवाळपुर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
- अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशन व ग्रामपंचायत आवाळपुरचा संयुक्त कार्यक्रम
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन अल्ट्राटेक सिमेंट कंपनी चे युनिट हेड, पी.एस.श्रीराम यांनी अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशन आवाळपुर व ग्रामपंचायत आवाळपुर यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्य बोलताने केले.
कोरपना तालुक्यातील आवाळपुर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रथमच अल्ट्राटेक सिमेंट कंपनी युनिट हेड, कर्नल दिपक डे हे गावात येत असल्याने गावात आनंदाचे वातावरण होते. यावेळी एकलव्य इंग्लिश मिडियम स्कूल बिबी च्या विद्यार्थ्यांनी बँड व लेझीम पथक च्या साहायाने पाहुण्यांचे स्वागत केले. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण संवर्धन व वृक्ष लागवडीचे संदेश देणारे पोस्टर दाखवत दिंडी काढली.
कार्यक्रमाला अल्ट्राटेक चे युनिट हेड पी.एस.श्रीराम, कर्नल दीपक डे, सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, विकास दिवे, कान्होबा भोंगळे, सुरेश दिवे, सुश्मिता पाणघाटे, नंदा सूर, कल्पतरू कन्नाके, एकता वानखेडे, त.मु.स. अध्यक्ष योगेश कातकर, माजी सरपंच लटारी ताजणे, भाविक उमरे, अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशन चे सचिन गोवारदीपे, किरण करमनकर, संजय ठाकरे, देविदास मांदाडे, जि.प. शाळा आवाळपुर चे मुख्याध्यापक उपरे सर व शिक्षक, एकलव्य चे मुख्याध्यापक नितेश शेंडे व शिक्षक इत्यादी मान्यवर तथा गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.