Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जेसीआय तर्फे चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहूल पावडे देशपातळीवर सन्‍मानित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जेसीआय तर्फे चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहूल पावडे देशपातळीवर सन्‍मानित आ. मुनगंटीवार यांनीही केला सत्‍कार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद...

  • जेसीआय तर्फे चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहूल पावडे देशपातळीवर सन्‍मानित
  • आ. मुनगंटीवार यांनीही केला सत्‍कार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूर मनपाचे उपमहापौर व भाजपाचे युवा नेते यांना जेसीआय इंडिया या संस्‍थेच्‍या वतीने २०२१ चा आऊटस्‍टेडींग युथ पर्सन या राष्‍ट्रीय पातळीवरील पुरस्‍काराने सन्‍मानित केले. त्‍याबद्दल त्‍यांचे कौतुक करीत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, चंद्रपूर महानगराचे कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, महानगराचे संघटन मंत्री राजेंद्र गांधी यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. 
याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, भाजपा हा ८० टक्‍के समाजसेवा व २० टक्‍के राजकारण या धोरणावर चालणारा राष्‍ट्रीय पक्ष आहे. याच धर्तीवर राहूल पावडे सुध्‍दा अनेक लोकोपयोगी कामे करून दलित, शोषीत, वंचित, समाजाला न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न नेहमीच करतो हे कौतुकास्‍पद आहे. त्‍याच्‍या हातुन अशीच कामे पुढील आयुष्‍यातही होत राहो या शुभेच्‍छा आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. 
सत्‍काराला उत्‍तर देताना राहूल पावडे यांनी नम्रपणे हा पुरस्‍कार स्विकारत असल्‍याचे सांगीतले तसेच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात आणि त्‍यांच्‍या मार्गदर्शनानुसारच मी आधीही काम करीत आलो आहे व पुढेही काम करीत राहील. कुठलाही पुरस्‍कार हा एकटयाच्‍या कामामुळे मिळत नसतो. संघटना आपल्‍या मागे उभी असावी लागते. अशी संघटना भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातुन माझ्या मागे उभी आहे हे मी माझे भाग्‍य समजतो. यापुढेही मी सामाजिक कामे सुरूच ठेवीन, अशी ग्‍वाही राहूल पावडे यांनी दिले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top