Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वनविभागाच्या निषेधार्थ नितीन भटारकर यांच्या आमरण उपोषणाला सुरवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वनविभागाच्या निषेधार्थ नितीन भटारकर यांच्या आमरण उपोषणाला सुरवात कामगार व सर्वसामान्यांना गमवावा लागत आहे जीव वन विभागाच्या ढिसाळ व नियोजनशू...

  • वनविभागाच्या निषेधार्थ नितीन भटारकर यांच्या आमरण उपोषणाला सुरवात
  • कामगार व सर्वसामान्यांना गमवावा लागत आहे जीव
  • वन विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभार
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
ऊर्जानगर, दुर्गापुर, CTPS वसाहतीसह प्रकल्पात मागील काही दिवसांपासून वाघ, बिबट्या व अस्वल यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मानवी वस्तीत देखील घुसून वावरत आहे.
काही कालावधी पूर्वी हिराई अतिथीगृह जवळ दुचाकीस्वार कामगारांवर हल्ला केला होता त्यात तो कामगार थोडक्यात बचावला होता मात्र गंभीर जखमी झाला होता. त्यापूर्वी उर्जानगर वसाहतीत ऑगस्ट २०२० ला ५ वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून मा. मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त यांना प्रत्यक्ष भेटून सतत पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु वनविभागा तर्फे कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने काल रात्री प्रकल्पात काम करणाऱ्या एका कामगारावर पट्टेदार वाघाने हमला करीत ठार केले. वारंवार या क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या या प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू होत असल्या नंतरही वन विभाग चंद्रपूर तर्फे कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येत नाही आहे. भविष्यात देखील वनविभागाच्या अशा कार्य प्रणालीमुळे अनेकांचे जिव जाऊ शकते व म्हणून या क्षेत्रातील पट्टेदार वाघ, बिबटे व अस्वल यांना जेरबंद करणे करीता तात्काळ ठोस निर्णय घ्यावे या मागणीला घेऊन आज वन विभाग चंद्रपूर यांच्या निषेधार्थ आज नितीन भटारकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी युवकांसह सदर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top