Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - नांदाफाटा परिसरतील बंजारा समाजाच्या वतीने संत सेव...
  • संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
नांदाफाटा परिसरतील बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नांदाफाटा येथे मिरवणूक काढण्यात आली. नांदा फाटा येथिल रहिवासी काशीनाथ शेरे आणि बंजारा समाजाच्या वतीने बांधकाम करण्यात आलेल्या बिबी रामनगर येथील दुर्गा माता मंदिरात सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी गोर सिकवाडी समितीचे नागपूर विभागाचे सहसंयोजक गोविंद पवार, महाराष्ट्राचे सहसंयोजक विनोद चव्हाण, नागपूरचे संयोजक विनायक राठोड, उमेश आडे, माधव पवार, सुदर्शन राठोड इत्यादी मंडळींनी समाजाला मार्गदर्शन केले. बिबी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी यावेळी बंजारा समाजबांधवांना मार्गदर्शन केले. 
यावेळी बंजारा समाजातील सैन्यात दाखल झालेल्या ब्रह्मा चव्हाण यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गोरसेना मंडळ नांदाफाटा, बिबी व आवारपूरचे पदाधिकारी नागेश रत्ने, काशिनाथ शेरे, विनोद राठोड, मनोहर चव्हाण, पंडित आडे, गोपीचंद आडे, शंकर रत्ने व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सहकार्य केले. यावेळी बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top