धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
गड़चांदूर येथील ऐतिहासिक बुद्धभूमी हे स्थळ प्राचीन इतिहासाचा महत्वाचा वारसा आहे. पर्वत वनराईने नटलेल्या या स्थळाचा विकास व सौंदर्यीकरण करण्यासाठी तसेच येथिल प्राचीन अवशेषांचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करू व बुद्धभूमीच्या विकासासाठी जास्तीतजास्त निधी आणून हे स्थळ प्रसिद्ध पर्यटन स्थळ करू आणि त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे मनोगत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी बुद्धभूमी परिसरातील अभ्यासिका तसेच सौंदर्यीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
या भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सविता टेकाम होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पापय्या पोन्नमवार, गटनेता विक्रम येरणे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, अश्विनी कांबळे, उपविभागीय अभियंता शंभरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत खैरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. हेमचंद दूधगवळी यांनी तर आभार विक्की मुन यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कोवन काटकर, शैलेश चांदेकर, देवानंद मुन, राहुल निरंजने, शाकेश उमरे यांनी व बौद्ध समाजबांधवांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.