Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: उपजिल्हा रुग्णालय क्षयरोग पथक नागपूर विभागातून प्रथम आणि राज्यात पाचवा क्रमांक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उपजिल्हा रुग्णालय क्षयरोग पथक नागपूर विभागातून प्रथम आणि राज्यात पाचवा क्रमांक  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम पुणे येथील कार्यक्रमात प...
  • उपजिल्हा रुग्णालय क्षयरोग पथक नागपूर विभागातून प्रथम आणि राज्यात पाचवा क्रमांक 
  • राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम पुणे येथील कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या निर्देशकानुसार जिल्ह्याचे मूल्यमापन करण्यात आले. मूल्यमापणानुसार राज्यस्तरावर उत्कृष्ट जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात आले. यात नागपूर विभागातून चंद्रपूर जिल्ह्यातील क्षयरोग पथक उपजिल्हा रुग्णालय राजुरा ला प्रथम आणि राज्यात पाचवा क्रमांक मिळाला आहे. 
यानुसार राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी येथे पार पडला. यावेळी राजुरा ग्रामीण रुग्णालयातील क्षयरोग दुरीकरण पथकाचे वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक उमेश डहाळे, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक संजय मंथनवार या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राज्यशासनाचे आरोग्य सेवेचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यात गडचिरोली, नागपूर, उस्मानाबाद, वर्धा, सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे, कोल्हापूर, नाशिक, मीरा भाईंदर हे महानगर पालिका क्षेत्र आणि मुंबई प्रांत दहिसर मुलुड, मालाड यांना उत्कृष्ट म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक लहू कुलमेथे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनात येथील क्षयरोग दुरीकरण पथकाचे उमेश डहाळे, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक संजय मंथनवार, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक यांनी क्षयरोग नियंत्रणात उत्कृष्ट कामगिरी करीत आहे त्यामुळे राजुरा तालुक्यात क्षयरोग नियंत्रनात झाले आहे हे विशेष. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top