- आमदार सुभाष धोटेंच्या मागणीला महसूलमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
- क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी मुंबई येथे तातडीची बैठक
- समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना महसूलमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी विनंती केली त्यावर बाळासाहेब थोरात यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महसूल विभागाची तातडीची बैठक घेऊन क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सिमेवरील १४ गावांचा भुमि अभिलेख / नकाशा तयार करून सीमा निश्चित करणे व जमीनीची मोजनी करणे तसेच अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना शेतजमीनीचे स्थाई पट्टे देणे, जिवती तालुक्यातील ८६०२ हेक्टर क्षेत्र वनपरीक्षेत्रात समाविष्ट नसल्याने विवादित क्षेत्रातून कमी करून महसूल विभागात हस्तांतरित करणे व तेथील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना स्थाई पट्टे देणे, जिवती तालुक्यातील मंजूर घरकुलांना वनविभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देणे अशा विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे स्पष्ट निर्देश राज्यचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने क्षेत्रातील नागरिकांचे महसूल विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रसंगी महसूल विभागाचे उप्पर मुख्य सचिव नितीन करीर, वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, आभासी प्रणालीद्वारे नागपूर विभागीय आयुक्त मनीषा वर्मा, अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर विद्युत वरखेडकर, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, राजुरा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख चंद्रपूर चे प्रमोद घाडगे, एस. त्रिपाठी, डॉ. संजय पाटील, विष्णू शिंदे, भूमी अभिलेख अधिकारी बडकेलवार तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा वारंवार प्रश्न उपस्थित करणारे रामदास रणवीर, विजय राठोड, बाळू पतंगे, शैलेश लोखंडे, राहुल उमरे, मिलिंद भातकांडे, प्राध्यापक हेमचंद दूधगवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.