Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लहान मुलांच्या शाळेच्या परिसराची साफसफाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लहान मुलांच्या शाळेच्या परिसराची साफसफाई शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - दुर्गापुर डब्ल्यू.सी.एल. कॉलनीत वनविभागाच्या उच्चस्तरी...
  • लहान मुलांच्या शाळेच्या परिसराची साफसफाई
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दुर्गापुर डब्ल्यू.सी.एल. कॉलनीत वनविभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसह के.के. सिंह व नितीन भटारकर यांनी जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची पाहणी केली.
सदर शाळेत शिकत असलेल्या लहान विद्यार्थ्यांपेक्षा उंच व मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने या जागेवर बिबट दबा धरून बसण्याची भिती वनविभागाने व्यक्त केली असल्याने तात्काळ विद्यार्थ्यांना तीन दिवसांची सुट्टी देऊन सदर परिसराच्या बाहेरील व आतील कचरा साफ करण्याचे निर्देश डब्ल्यूसीएल प्रशासनाला दिले. त्या अनुषंगाने आज दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंच सौ. पूजाताई मानकर, माजी सरपंच अमोल ठाकरे, सचिन मांडाले, मनोहर भांडवलकर, सौ. सुनंदाताई टोंगे, निखिल हस्ते, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रतीक भांडवलकर, आसिफ खान पठाण, पवन बंडीवार, गणेश यादव यांच्या उपस्थितीत शाळेच्या परिसराच्या संपूर्ण साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top