Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर नगर परिषदेत नवीन सभापतींची नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर नगर परिषदेत नवीन सभापतींची नियुक्ती धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - नगर परिषद गडचांदूरमध्ये नवीन सभापतींच्या नि...
  • गडचांदूर नगर परिषदेत नवीन सभापतींची नियुक्ती
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नगर परिषद गडचांदूरमध्ये नवीन सभापतींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पीठासीन अधिकारी महेंद्र वाकळेकर तहसीलदार कोरपना व गडचांदूर येथिल नप मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेरकी यांच्या उपस्थितीत नवीन सभापतींच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली.
नव नियुक्त सभापतिमधे कांग्रेसचे अरविंद मेश्राम यांना बांधकाम सभापती, राष्ट्रवादी कांग्रेसच्या सौ. अश्विनी कांबळेला आरोग्य व स्वच्छता सभापती, शिवसेनेच्या सौ. किरण अहिरकर ला महिला व बालकल्याण सभापती आणि राष्ट्रवादी कांग्रेस च्या सौ. कल्पना निमजे ला महिला व बालकल्याण विभागाचे उप सभापती पद मिळाले आहे. बैठकीत नगराध्यक्षा सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, पापय्या पोन्नमवार, विक्रम येरणे, सागर ठाकूरवार यांच्यासह अनेक नप सदस्य व कर्मचारीगण उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top